Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : दुरुस्तीनंतर अवघ्या तीन महिन्यात रस्ता खड्डेमय! खामगाव-टेंभूर्णा मार्गावरील प्रकार; निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुरू असून ३८० महाविद्यालयांमध्ये १११ अभ्यासक्रमांसाठी २ लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीसाठी २८ ते ३० जुलैदरम्यान विद्यार्थी ऑनलाइन पसंतीक्रम भरत असून यंदा २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 09:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

खामगाव, ब्यूरो : खामगाव-टेंभूर्णा मार्गाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली असतानाही रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, निकृष्ट कामाचा आरोप केला आहे.

Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. यापूर्वी दुपदरी असलेला हा रस्ता चौपदरी करण्यात आल्याने वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी रस्त्याची पुन्हा दुरुस्ती केली होती. मात्र, ही दुरुस्तीही निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता समोर आले आहे. अल्पावधीतच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या रेल्वे अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावर वळविण्यात आली आहे. दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने हजारो नागरिकांना दररोज याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

सातारा अन् पंढरपुरात माजी सैनिकांसाठी साकारणार अद्ययावत संकुल! महायुती सरकारचा मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता चिखलमय

शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले, तरी मातीमिश्रित मुरूम टाकून करण्यात आलेल्या कामामुळे पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले; मात्र, त्यामध्ये दर्जेदार साहित्याचा वापर न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Road riddled with potholes just three months after repairs in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
1

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
2

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल
4

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.