फोटो सौजन्य: @bhaumikgowande (X.com)
सुमारे 370 हेक्टर क्षेत्रफळात विस्तारलेले वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे मुंबईचे एक अत्यंत महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र बनले आहे. सतत वाढत असलेल्या आर्थिक घडामोडी, व्यावसायिक संधी आणि विविध कंपन्यांच्या ऑफिसमुळे दररोज सुमारे 2 लाख कर्मचारी इथे दाखल होतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे, विशेषतः सायन पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक बीकेसीकडे वळवण्यात आली आहे. लहान वाहनांसाठी अधिक अनुकूल असलेल्या रस्त्यांवर सध्या अवजड मालवाहतूक वाहनं वाढल्यामुळे कारणीभूत ठरत आहे.
या समस्येवर तात्काळ आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मुंबई वाहतूक पोलिस विभागाने एक संयुक्त आणि सखोल वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली आहे. या योजनेची आखणी करताना प्रवाशांची संख्या, भविष्यातील वाढीचा वेग, सुरू असलेली पायाभूत कामे आणि विविध भागधारकांचा अभिप्राय यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.
या योजनेचा प्रमुख भाग म्हणजे बीकेसी परिसरातील वापरात नसलेले सायकल ट्रॅक हटवून त्याचे वाहन मार्गिकेत रूपांतर करणे. यामुळे रस्त्यांची रुंदी वाढून प्रत्येकी ६००–९०० वाहनांची वाहतूक क्षमता वाढेल, असा अंदाज आहे. सध्या असलेल्या २+२ मार्गिकांना ३+३ मार्गिकांमध्ये परिवर्तित करून सुमारे ५०% रस्ता वाढ करण्यात येणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल, म्हणजेच वेळेत ४०% बचत होईल. याशिवाय, सिग्नल किंवा अरुंद भागांतील प्रतीक्षा वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत कमी होईल. वेळेची ही ३०% बचत इंधनाची आणि कार्बन उत्सर्जनाची बचतही साधून देईल. उदाहरणार्थ, एका पेट्रोल वाहनाचे CO₂ उत्सर्जन १,१३३ ग्रॅमवरून ७९३ ग्रॅमपर्यंत कमी होईल.
७ मीटर + ७ मीटर रस्ता आणि २.७ मीटर सायकल ट्रॅक → ९.७ मीटर + ९.७ मीटर (३+३ लेन)
७ मीटर + ७ मीटर रस्ता आणि १.५ मीटर सायकल ट्रॅक → ८.५ मीटर + ८.५ मीटर (३+३ लेन)
३.५ मीटर + ३.५ मीटर रस्ता आणि १.५ मीटर सायकल ट्रॅक → ५.० मीटर + ५.० मीटर (२+२ लेन)
कांद्याला हंगामातील मिळाला सर्वात कमी दर; 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव
योजनेचा दुसरा भाग म्हणजे बीकेसीमधील व्यस्त रस्त्यांवर एकेरी वाहतूक पद्धतीची अंमलबजावणी. यामुळे अंतर्गत दळणवळण सुरळीत होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत नेहमीच जाम राहणाऱ्या रस्त्यांवरील भार हलका करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
एमएमआरडीएचे अधिकारी म्हणाले मते, “एमएमआरडीएच्या या धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण व एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करून आम्ही बीकेसीमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहोत. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल आणि प्रवाशांसाठी बीकेसी अधिक सुलभ व ॲक्सेसिबल होईल. बीकेसीचे वाढणारे आर्थिक महत्त्व आणि अभ्यागतांची वाढती संख्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.