Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

खामगावमध्ये पहिल्याच दमदार पावसानंतर शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 26, 2026 | 08:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
  • साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.
  • नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
खामगाव शहरात पहिल्याच दमदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अवघ्या तासभर झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेले असून, नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

फरशी चौक, एकबोटे चौक, विक्रमशी चौक, सिव्हिल लाईन, मेन रोड आदी भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खडीही उखडून पडल्याने दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, नगरपालिकेकडून यापूर्वी खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हे सर्व खड्डे पुन्हा उघडे पडले. रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वाहनांमुळे उडणारे घाण पाणी शिरत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

नागरिक दीपक महाकाले यांनी सांगितले की, रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात वाढत असून सततच्या धक्क्यांमुळे मणक्याच्या आजारांचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तर श्री सेवा मेडिकलचे संचालक शिवकुमार राठी यांनी सिव्हिल लाईन भागातील साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून विविध आजारांचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले.

माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी SIT कडून कारवाई

युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल यांनी नगरपालिकेवर टीका करत, केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनी नगर प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Roads in a state of disrepair in the first rain citizens troubled by potholes in khamgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
1

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
2

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
4

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.