Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Buldhana Farmers Kharif Crop Damage : बुलढाण्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन, पेरणीला झालेला विलंब आणि त्यानंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 04:16 PM
Buldhana Farmers Kharif Crop Damage

Buldhana Farmers Kharif Crop Damage

Follow Us
Follow Us:
  • सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले
  • आता कपाशी तुरीवर भिस्त
  • पावसाची तूट चिंताजनक
बुलढाणा: शेती मातीशी नाळ घट्ट जुडलेल्या शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पाऊस, आशेचा किरण घेऊन येत असतो. रोहिणी आणि मृग नक्षत्रात कोसळणाऱ्या या पावसावर खरीप पेरणी झाल्यास पर्यायाने पिकाची उगवण क्षमता चांगली होते. फुलधारणा देखील चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते. मात्र, यंदा उशिराने झालेले पावसाचे आगमन, पेरणीला झालेला विलंब आणि त्यानंतर अधून मधून आलेल्या सरींवर खरीप पिके बहरली होती. परंतु फुलधारणा व शेंगा लगडण्याचे अवस्थेत तब्बल ४० ते ४५ दिवसांचा खंड सोयाबीन, उडीद, मुग यासह अन्य पिके करपल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता केवळ कपाशी आणि तूर पिकावर ज्या काही आशा उरल्या आहेत, त्या केवळ परतीच्या पावसावर आहे.शेती पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर विसंबून आहे. त्यातही कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशा नैसर्गिक संकटाच्या मालिकेत देखील शेतकरी धनधान्य पिकविण्यासाठी धडपडत असतो. निसर्गाच्या चक्रव्यूहातून जो काही माल हाती येतो त्याला बाजारात देखील भाव मिळत नसल्याने शेती शेतकऱ्यांसाठी फायद्यापेक्षा तोट्याची ठरत आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

कापसाचे क्षेत्र सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टर आहे. काही भागात कापसाची वाढ समाधानकारक असली तरी पावसातील खंडामुळे बॉडधारणा आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुरीचे क्षेत्र सुमारे ९९ हजार ५२२ हेक्टर असून, या पिकालाही शेवटच्या टप्प्यात ओलावा आवश्यक आहे. पावसाअभावी तूर, मूग आणि उडिदाच्या पिकांवरही परिणाम झाल्याच्या नोंदी आहेत. आता परतीच्या पावसाच्या सरी झाल्यास उशिराच्या पिकांना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

पावसाची तूट चिंताजनक

सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांवरील संकट तीव्र झाले. २ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी असल्याची नोंद करण्यात आली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तत्काळ मदत द्यावी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा विविध शेतकरी संघटना व स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करावा, पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Web Title: Buldhana kharif crop damage soybean urad moong cotton tur rainfall deficit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • kharif crops

संबंधित बातम्या

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
1

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना
3

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी
4

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.