संग्रहित फोटो
२५ जून रोजी सांयकाळी वडगाव खंडोपंत येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुंदन दादाराव शेळके (२०) याचा वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी भूषण दयाराम पाटील (३२) आणि कुंदन शेळके यांनी एमएच २८/ एबी ३००१ या क्रमांकाच्या दुचाकीवर केक ठेवून तो तलवारीने कापला. त्यानंतर गोविंदा रमेश पाटील (३२) याने हातातील तलवार हवेत फिरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. सदर घटनेची माहिती मिळताच प्रवीण पडोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
त्यानंतर शुक्रवारी दुपारी १ वाजता भूषणच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर तलवार आढळून आली. जिल्हाधिकारी, बुलढाणा गांच्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केल्याप्रकरणी पडोळ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तिपांविरुद्ध कलम ४/२५ भारतीय शख अधिनियम सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेकाँ. अमोल खराडे करीत आहे.






