Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगाव दाभाडेत पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा, दहा लाखांचा ऐवज लुटला; भरदिवसा घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ

मावळ (Maval) तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) परिसरात राहणाऱ्या एका किराणा (Kirana) व्यापाऱ्याच्या घरात घुसून भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2023 | 10:40 AM
तळेगाव दाभाडेत पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा, दहा लाखांचा ऐवज लुटला; भरदिवसा घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ (Maval) तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) परिसरात राहणाऱ्या एका किराणा (Kirana) व्यापाऱ्याच्या घरात घुसून भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. पिस्तूल व चाकुचा धाक दाखवून दरोडेखोरांनी तब्बल साडेतीन लाखांची रोकड तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हि घटना मंगळवार दि १० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या आणखी एका घटनेनं आज तळेगाव शहरसह मावळ तालुका पुन्हा एकदा हादरलं आहे. याबाबत दिलीप चंपालाल मुथा वय ५५ रा. तळेगाव दाभाडे जि. पुणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडगाव मावळ येथे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या पत्नीसह वडगाव येथे किराणा दुकानात गेले होते.

जेवण करण्यासाठी ते दोघेही तळेगाव दाभाडे येथील घरी २ वाजण्याच्या सुमारास परत आले. त्यावेळी घरात त्यांच्या दोन मुली होत्या. त्याचवेळी चेहऱ्याला मास्क लावलेले चार-पाच अनोळखी इसम घरात घुसले.

त्यांनी मुथा यांच्या कुटुंबियांना चाकुसह बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी मुथा यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह साडे दहा लाखाचा ऐवजी लुटून नेला. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपीचा मागवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तळेगाव परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा घडलेले ह्या दरोडाच्या घटनेने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवल जात आहे. दरोडेखोरांनी भर दिवसा दरोडा टाकून पोलिसांना खुले आवाहन दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी करीत आहेत.

Web Title: Robbery at talegaon dabhade at gunpoint 10 lakhs looted the incident that happened in broad daylight created excitement in the city nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 10:40 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
2

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
3

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
4

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.