Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पवना धरणातून थेट बंद पाईपलाईन प्रकल्पाला तातडीने गती देण्याची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 12:30 AM
पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पवना धरणातून थेट बंद पाईपलाईन प्रकल्पाला तातडीने गती देण्याची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. राहुल कलाटे यांनी १ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी हा विषय गांभीर्याने उपस्थित करत प्रकल्पाच्या विलंबाकडे लक्ष वेधले होते.

 

पवना थेट बंद पाईपलाईन योजना ही शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रकल्पासाठी महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, एकूण खर्चाच्या किमान २५ टक्के निधीची उपलब्धता नसल्यास निविदा प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन प्रकल्प पुन्हा रखडण्याची शक्यता असल्याचे कलाटे यांनी नमूद केले आहे.

सध्या पवना धरणातून दररोज सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवठा केला जातो. नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येणारे पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. काही प्रमाणात प्रदूषणामुळे पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे.

पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास अंदाजे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन तेवढे अतिरिक्त पाणी नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. हा प्रकल्प मागील सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असून, खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला ३०० कोटी रुपयांचा अंदाज असलेला हा प्रकल्प तब्बल १२५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित होणार

या योजनेअंतर्गत पवना धरणातून निगडी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ३४.७१ किलोमीटर लांबीची भूमिगत बंद जलवाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासह स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे.

हे सुद्धा वाचा : पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

 शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

“वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. टँकर व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळेल,” असे मत राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर मार्गी लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Rahul kalate has requested the chief minister to expedite the pawana pipeline project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
1

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
2

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
3

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित ‘डीपीआर’ तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल…
4

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित ‘डीपीआर’ तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.