Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती, इंदापूरमध्ये विरोधकांकडून पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप; पैशाच्या वाटपासाठी पोलीस वाहनाचाही वापर?

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha) बारामती व इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मतदारांना जात व धर्म बघून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2024 | 10:56 AM
बारामती, इंदापूरमध्ये विरोधकांकडून पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप; पैशाच्या वाटपासाठी पोलीस वाहनाचाही वापर?
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha) बारामती व इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मतदारांना जात व धर्म बघून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना केला. पैसे वाटपासाठी पुणे जिल्हा बँक देखील रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आरोप फेटाळला आहे.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, शहरी भाग असणारा खडकवासला, हवेली या ठिकाणी देखील पैशाचे वाटप विरोधकांनी केले. बारामतीमध्ये कधी मतदानासाठी पैशाचे वाटप केले जात नव्हते. मात्र, त्या ठिकाणी देखील पैशाचे वाटप करण्यात आले. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. मतदारांना प्रत्येकी दोन हजार, तीन हजार ते ५,००० पर्यंत जात व धर्म बघून पैसे वाटप करण्यात आले. वास्तविक, पाहता अनेक ठिकाणी मतदारांनी हे पैसे नाकारले. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गरिबांसाठी पाच वाजता बंद होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत पैसे वाटपासाठी ही बँक सुरू होती, असा आरोप देखील रोहित पवार यांनी यावेळी केला. बारामती पाणी इंदापूरमध्ये पैसे वाटप होत असल्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पोलीस त्याकडे बघूनही दुर्लक्ष करत होते. पोलीस गाड्यांचा वापर पैसे वाहतुकीसाठी झाला का काय, याची देखील माहिती घ्यावी लागेल असे आमदार रोहित पवार म्हणाले.

Web Title: Rohit pawar alleged that money was distributed by the opposition in baramati and indapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Lok Sabha
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा
1

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
2

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
3

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
4

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.