Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो’ निर्णय तुमचा नव्हताच…; अजित पवारांना उद्देशून रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  त्यांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 14, 2024 | 01:22 PM
‘तो’ निर्णय तुमचा नव्हताच…; अजित पवारांना उद्देशून रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.  यात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पण अजित पवारांनी नुकताच आपाला हा निर्णय अत्यंत चुकीचा होता, असे वक्तव्य करत आपली चुकीची कबुली दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  त्यांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. पण आमदार रोहित पवार यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  अजित पवारांना उद्देशून भाष्य केलं आहे.रोहित पवारांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत  केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हटले आहे रोहित पवारांनी?

“आदरणीय दादा, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे. #दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, #विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या #कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का #वादा आहे.

आदरणीय दादा, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात.… pic.twitter.com/FoNOfVvwD5 — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2024

दरम्यान,  अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना बारामती लोकसभ निवडणुकीवर भाष्य केलं होते. ” राजकारण हे घरामध्ये येऊ द्यायचं नसतं. राजकारण घर आणि कुटुंबापासून दूर ठेवले पाहिजे. पण मागे मात्री माझ्याकडून एक चूक झाली. लोकसभा निवडणुकीत  मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण , पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण तसं व्हायला नको होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

हेदेखील वाचा: मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्या फाईल्स; अजित पवारांच्या आमदारांची घुसमट 

Web Title: Rohit pawars criticized ajit dada for admitting his mistake in loksabha election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • LOKSABHA ELECTION
  • rohit pawar

संबंधित बातम्या

आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा
1

आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा

राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच; ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
2

राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच; ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?
3

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?

Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीसाठी तहसीलदार येवलेंनी काय काय केलं? धक्कादायक पुरावे उघड
4

Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीसाठी तहसीलदार येवलेंनी काय काय केलं? धक्कादायक पुरावे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.