Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS सरसंघचालक डॉ. मोहन भागवत साधणार ‘वनवासी एकल शिक्षकां’शी संवाद

कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे विदर्भात चालवल्या जाणाऱ्या एकल विद्यालयांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याची योजना तयार झाली आहे. या कामाचा तपशील कर्मयोगी मेळाव्यात जाहीर केला जाईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 02:35 AM
RSS सरसंघचालक डॉ. मोहन भागवत साधणार 'वनवासी एकल शिक्षकां'शी संवाद

RSS सरसंघचालक डॉ. मोहन भागवत साधणार 'वनवासी एकल शिक्षकां'शी संवाद

Follow Us
Close
Follow Us:

नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जातात एकल विद्यालये
मानकर ट्रस्टच्या आदिवासी विद्यार्थी शिक्षण उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा आरंभ
डॉ. मोहन भागवत वनवासी एकल शिक्षकांशी संवाद साधणार

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवत हे २ मे 2026 रोजी मुंबईत होणाऱ्या ‘कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात’ वनवासी भागातील शिक्षणाला गति देणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकल विद्यालये चालवली जातात.  ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके हे देखील उपस्थित राहतील. नागपूर स्थित कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे विदर्भात चालवल्या जाणाऱ्या एकल विद्यालयांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याची योजना तयार झाली आहे. या कामाचा तपशील कर्मयोगी मेळाव्यात जाहीर केला जाईल.

तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने विदर्भातील वनवासी भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. आज विदर्भातील गडचिरोली, मेळघाटसह विविध दुर्गम भागात सुमारे १३०० शाळांच्या माध्यमातून ३० हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून, १८०० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या यशस्वी प्रवासानंतर आता संस्थेने महाराष्ट्रभर ५००० शाळा, ६००० शिक्षक यांचे जाळे निर्माण करून १ लाख वनवासी-मागास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे.

Maharashtra Politics : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईचे सुप्रसिद्ध व्यावसायिक  अतुल शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. शिरोडकर यांच्या मते, “शिक्षण हे सामाजिक आणि आर्थिक बदलासाठी एक प्रभावी साधन आहे. मानकर ट्रस्ट वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.” विशेष म्हणजे, हे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरित आहे.

संस्थेच्या विस्ताराच्या या नवीन टप्प्यात, अध्यक्ष म्हणून श्री अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्य वेगाने प्रगती करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती, कौशल्य विकास, दुग्धव्यवसाय प्रशिक्षण, वनवासी समुदायांचे शिक्षण, तसेच त्यांच्या कला आणि संस्कृतीच्या संवर्धनावर विशेष भर दिला जात आहे.

या कार्यक्रमात (२ मे, सायंकाळी ६ वाजता), राज्यभरातील विविध भागांतील शिक्षक, सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य श्रीमती मायाताई इवनाते यांचा सन्मान केला जाईल आणि पंडित नीलाद्री कुमार सतारवादन करतील.

जैसलमेरमध्ये होणार जैन समाजाचा ‘हा’ भव्य कार्यक्रम; RSS सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित

या कार्यक्रमात, वनवासी शिक्षणाच्या चळवळीला नवी दिशा कशी देता येईल यावर विचारमंथन करण्यासाठी राज्यातील विविध सामाजिक क्षेत्रे एकत्र येणार आहेत. संस्थेने सर्व स्तरांतील नागरिकांना या प्रयत्नाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. वनवासी समुदायांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या चळवळीला गती देण्यासाठी हा मेळावा एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Web Title: Rss chief dr mohan bhagwat will interact with vanvasi single teachers nitin gadkari fadnavis vidarbha program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • mohan bhagwat
  • Nitin Gadkari
  • RSS

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
1

Maharashtra Politics : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान
2

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.