जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ (फोटो- सोशल मीडिया)
देशभरातल्या विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन
जैसलमेर मध्ये होणार भारतीय संस्कृतीचा महाकुंभ
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राहणार उपस्थित
मुंबई: स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर महामहोत्सव आयोजित करण्यात येत असून या महोत्सवात भारतीय संस्कृती आणि समरसता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ मार्च रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून ८ मार्च पर्यंत श्रद्धा, तप व त्यागपरंपरेचा उत्सव सुरु राहणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात दिली. हा अध्यामिक महोत्सव सामाजिक बंधुभाव आणि आस्थेचं प्रतीक असल्याचे प्रतिपादनही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाने समरसता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. येत्या ६ मार्च पासून सुरू होणारा हा महोत्सव ८ मार्च पर्यंत चालणार असून यात सुमारे एक लाख भाविक सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर समरसता कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभरातून विविध धर्म आणि पंथांचे २५०० साधू , संत आणि महंत वसुधैव कुटुम्बकम् यावर वैचारिक मंथन करणार आहेत.
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा
खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादरचे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे. जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या ८७१ वर्षांपूर्वीच्या अग्निसंस्कारावेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यांचे पवित्र वस्त्र चादर, चोल-पट्टा व मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत व पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो. खरतरगच्छ समुदायासाठी हा महोत्सव अत्यंत आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो.
आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना
संपूर्ण देशात या आयोजनाबाबत मोठा उत्साहअसून तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सवादरम्यान दादा गुरुदेवांशी संबंधित पवित्र चादर, चोल-पट्टा व अन्य ऐतिहासिक वास्तूंचे विशेष पूजन, आराधना, प्रवचन, भक्ती कार्यक्रम, ऐतिहासिक ५ किलोमीटरची शोभायात्रा तसेच सामूहिक धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत. हा महोत्सव आध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून समाजात धर्म, संयम, अहिंसा आणि सदाचाराचा संदेश प्रसारित करणारा आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.






