Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून ‘या’ नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2024 | 07:44 AM
Maharashtra Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून 'या' नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Maharashtra Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून 'या' नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Follow Us
Follow Us:

नागपूर: काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला 50 वरच रोखले आहे. दरम्यान , आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्रीपदाबाबत आपले म्हणणे स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.

महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटल्याची चर्चा सुरू आहे. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहीजे  यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपचे संसदीय मंडळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे नेते काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे. उद्या शपथविधी होणार असल्याने यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर , ते भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्यास भाजप काय निर्णय घेते हे पहावे लागेल.

हेही वाचा: Maharashtra Election 2024: जे ‘वस्तादा’ला जमलं नाही ते ‘पठ्ठ्यानं करून दाखवलं; फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक

फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक

 

देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

 

Web Title: Rss want devendra fadanvis cm of maharashtra ajit pawar eknath shinde bjp for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 07:44 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Eknath Shinde
  • RSS

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
4

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.