Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2025 | 03:26 AM
संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार (फोटो सौजन्य-X)

संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले.ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या रचना या मराठी भाषेतच आहेत. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाडामधील श्री केशवराज मंदिरात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आज संतशिरोमणी श्री संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत करा; पालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी अनेकवेळा मी पंढरपुरात येऊन गेलो, पण आजचे वातावरण बघून मन भरुन गेले. संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हा सोहळा होतोय, या वाड्यात अनेक संतांचे वास्तव्य होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने इथं सेवा केली. त्यामुळे इथं पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य समजतो. हे स्थान म्हणजे वारकऱ्यांचे चालते बोलते विद्यापीठ आहे. नामदेव महाराजांच्या नावे हा पुरस्कार म्हणजे कृतार्थ होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आहे, असे ते म्हणाले. मला काय मिळालं यपेक्षा समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आजवर काम केले. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा पुरस्कार असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. संत सजन्नांनी आणि लाखो वारकऱ्यांनी दिलेला हा पुरस्कार रुपी आशिर्वाद आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय, असे ते म्हणाले. बाळासाहेब, दिघे साहेब सांगायचे संत सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच मार्गाने आपण पुढे जातोय, असे ते म्हणाले.

नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. नामदेव महाराज जितके मराठी माणसांचे आहेत तितकेच ते शिखांचे देखील आहेत. किर्तन कलेतून प्रत्यक्ष पांडुरंग डोलायचे, अशी नामदेव महाराजांची किर्ती होती. त्यांनी निष्ठेने वारकरी पंथांचा प्रसार केला. बहुजन समाजाच्या सुप्त आकांक्षा जागवल्या. साधुसंतांच्या चरणांच्या धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपुरात विठ्ठल मंदिरात महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. कुत्र्याने भाकर पळवली तर त्याला ती कोरडी खायला लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन पळणाऱ्या नामदेव महाराजांच्या ठायी प्रचंड माणुसकी आणि भूतद्या होती, हे दिसून येते. हे सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या राज्यात कोणी उपाशी राहू नये, औषध उपचारांविना रुग्णांचे हाल होता कामा नये, शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशीच सरकारची भावना आहे. हा एकनाथ शरिरात रक्ताचा थेंब असे पर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत राहिल. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान नेहमीच वरचढ राहिले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्यासाठी कटिबद्ध

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी असे अनेक निर्णय सरकारने घेतले. मंदिर हेच संस्कारांचे मुख्य केंद्र असल्याने सरकारने ब तिर्थक्षेत्रांचा विकास निधी २ कोटींवरुन ५ कोटी केला. गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध होतो, आहे आणि राहीन, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संताचे विचार समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला या परंपरेशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Navi Mumbai : सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली …. ; सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याच्या दुरावस्थेवर मनसे आक्रमक

Web Title: Saint literature will make efforts to reach 14 languages in india assured deputy chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • pandharpur

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.