Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीसांच्या पाठिंब्यावरून तासगावात राजकीय खळबळ; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिड्डेंना फटकारले

तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारदरम्यान भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी केलेल्या विधानांमुळे मोठी राजकीय खळबळ माजली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 06:22 PM
फडणवीसांच्या पाठिंब्यावरून तासगावात राजकीय खळबळ; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिड्डेंना फटकारले

फडणवीसांच्या पाठिंब्यावरून तासगावात राजकीय खळबळ; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिड्डेंना फटकारले

Follow Us
Follow Us:
  • फडणवीसांच्या पाठिंब्यावरून तासगावात राजकीय खळबळ
  • मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिड्डेंना फटकारले
  • पालकमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडून खात्री करून घ्यावी : गिड्डे
तासगाव : तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारदरम्यान भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी केलेल्या विधानांमुळे मोठी राजकीय खळबळ माजली आहे. गिड्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठींबा दर्शविल्याचा दावा केला होता. त्यांनी यासाठी एक मेसेजही दाखवला होता. या दाव्यानंतर शुक्रवारी दुपारी तासगावात झालेल्या सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकृत व्हिडिओ सादर केला. या व्हिडिओमध्ये तासगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार विद्या चव्हाण यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गिड्डे यांनी केलेल्या दाव्यांमध्ये आणि अधिकृत भूमिकेत स्पष्ट विसंगती असल्याचे समोर आले.

 

गिड्डे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश पाळले नाहीत, असा उल्लेख केला होता. मात्र दुपारच्या व्हिडिओ सादरीकरणानंतर परिस्थितीत महत्त्वाचा बदल झाल्याचे दिसले. या घडामोडींनंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात संदीप गिड्डे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडून खात्री करून घ्यावी : गिड्डे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना संदीप गिड्डे म्हणाले की, तासगावात स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या गटबाजीवर भाष्य करणे आवश्यक होते. मी दिलेला मुख्यमंत्र्यांचा दाखला जर खोटा असेल, तर पालकमंत्र्यांनी थेट माझ्यावर पोलीस केस करावी. एआय व्हिडिओ दाखवून मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न होऊ नये. मुख्यमंत्र्यांसोबत झालेले संभाषण गोपनीय असल्याने मी ते उघड करत नाही, मात्र पालकमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडून खात्री करून घ्यावी. मी केलेल्या विधानाला पालकमंत्र्यांकडून थेट उत्तर दिले जात आहे, हीच माझ्या पत्रकार परिषदेची पोहोच असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत भाजपच्या वरिष्ठांचा आदेश पाळणार असल्याचे मी स्पष्ट केले होते, पण हेच चंद्रकांत पाटील यांनी पाहिले नाही, असेही गिड्डे यांनी नमूद केले.

Web Title: Sandeep gidde has made a big statement during the campaign for the tasgaon municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • CM Devedra Fadnavis
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन
4

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.