Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : शासकीय रक्तपेढी आणि डायलिसीसची सुविधा; कस्तुरबा रुग्णालयात लवकरच रुग्णांना मिळणार मोफत उपचार

, तासगाव येथील कस्तुरबा रुग्णालयात लवकरच आधुनिक डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 06:29 PM
Sangali News : शासकीय रक्तपेढी आणि डायलिसीसची सुविधा; कस्तुरबा रुग्णालयात लवकरच रुग्णांना मिळणार मोफत उपचार
Follow Us
Follow Us:
  • शासकीय रक्तपेढी आणि डायलिसीसची सुविधा
  • कस्तुरबा रुग्णालयात लवकरच रुग्णांना मिळणार मोफत उपचार
सांगली :  तासगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातील डायलिसीस रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, तासगाव येथील कस्तुरबा रुग्णालयात लवकरच आधुनिक डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली. यासोबतच शासकीय रक्तपेढी सुरू करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. आमदार पाटील यांनी तासगाव नगरपालिका मालकीच्या कस्तुरबा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला.

हस्तांतरित करण्यासंदर्भातही विचारविनिमय
यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, रुग्णसंख्या, डॉक्टर व कर्मचारी यांची उपलब्धता तसेच औषध पुरवठा यंत्रणेची माहिती घेतली. रुग्णालयाचे प्रभारी सहयोगी प्राध्यापक व डेंटल सर्जन डॉ. आर. बी. हजारे यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा केली तसेच रुग्णालयाची इमारत तासगाव पालिकेकडून मिरज येथील शासकीय रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातही यावेळी विचारविनिमय झाला.

Satara News : शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा ; प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप

मनुष्यबळ व सुविधा वाढवण्याची गरज
रुग्णालयात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कॉट संख्या वाढवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात किंवा इतर ठिकाणी धावपळ करावी लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. हजारे यांनी रुग्णालयाच्या कार्याचा आढावा देताना येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला. शेजारील चार जिल्ह्यांच्या तुलनेत तासगाव येथील रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनुष्यबळ व सुविधा वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तासगाव तालुक्यातील रुग्णांना दिलासा
या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, अॅड. तुकाराम कुंभार, स्वप्नील जाधव, अरुण साळुंखे, अभिषेक देशिंगकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डायलिसीस सेंटर व रक्तपेढी सुरू होण्यामुळे तासगाव तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

Web Title: Sangali news government blood bank and dialysis facility patients will soon get free treatment at kasturba hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
2

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.