Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : गॅसटंचाईचा जोरदार फटका ; अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, मेनूतील 60 टक्के पदार्थ बंद

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून काही हॉटेल्सनी मेनूतील सुमारे 60 टक्के पदार्थ बंद केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 04:01 PM
Sangali News : गॅसटंचाईचा जोरदार फटका ; अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, मेनूतील 60 टक्के पदार्थ बंद
Follow Us
Follow Us:
  • गॅसटंचाईचा जोरदार फटका ;
  • अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर,
  • मेनूतील 60 टक्के पदार्थ बंद
सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून काही हॉटेल्सनी मेनूतील सुमारे 60 टक्के पदार्थ बंद केले आहेत, तर काही ठिकाणी चहा नाश्ताही बंद करण्यात आला आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आजच बंद पडली असून काही उद्यापासून बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगड्या किंवा चुलींचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे सेवा देण्यास उशीर होत असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सेवा देणे शक्य होत नसल्याची तक्रार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार
सांगली जिल्ह्यात सुमारे ३ ते ३.५ हजार हॉटेल्स असून त्यावर लाखाहून अधिक कामगार अवलंबून आहेत. हॉटेल्स बंद झाल्यास या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. याशिवाय भाजीपाला उत्पादक शेतकरी, धान्य पुरवठादार, मटण-चिकन व अंडी विक्रेते अशा अनेक घटकांवरही या परिस्थितीचा साखळी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

रेशनिंग तत्वावर रोज एक व्यावसायिक गॅस द्या; हॉटेल असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दरम्यान, हॉटेल असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत किमान कामगारांच्या जेवणासाठी तरी रेशनिंग तत्त्वावर दररोज एक व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत हॉटेल व्यवसाय टिकवण्यासाठी आणि हजारौ कामगारांचा रोजगार वाचवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

सांगलीमधील नामांकित हॉटेलांचे शटर आता बंद
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने सांगली शहरातील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडल आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील काही नामांकित हॉटेलांना तात्पुरते शटर खाली ओढण्याची वेळ आली आहे. गॅसअभावी काही हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून शहराबाहेरील ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याचा मार्ग अवलंबला आहे. मात्र या व्यवस्थेमुळे खर्च, वेळ आणि मनुष्यबळ यांचा मोठा ताण सहन करावा लागत असल्याचे व्यावसायिक सांगतात. लवकरच गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर आणख हॉटेलांना कुलूप लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गैस सिलिडरचा पुरवठा नियमित करावा, अशी मागण जोर धरू लागली आहे.

Kolhapur News : एसटीची डिजिटल मोहीम ; एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा

Web Title: Sangali news many hotels are on the verge of closing due to lpg gas shortage 60 percent of the items on the menu are closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • lpg cylinder
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
1

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG  ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!
2

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.