Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या ऐरणीवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार,आमदार रोहित पाटील यांचा पाहणी दौरा

तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वाढत्या अडचणींची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील सावळज, वायफळे व चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 05:53 PM
Sangali News : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या ऐरणीवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार,आमदार रोहित पाटील यांचा पाहणी दौरा
Follow Us
Follow Us:
  • प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या ऐरणीवर
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
  • आमदार रोहित पाटील यांचा पाहणी दौरा
सांगली : तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वाढत्या अडचणींची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील सावळज, वायफळे व चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णांशी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि वाढता रुग्णभार या प्रमुख समस्या समोर आल्या.

उष्माघाताच्या रुग्णांसाठी सुविधा द्याव्यात
जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या औषध पुरवठ्यात काही महत्त्वाच्या औषधाची कमतरता भासत असल्याने रुग्णसेवा टिकवण्यासाठी काही औषधे खासगी स्तरावर खरेदी करावी लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. दरम्यान, शिपाई व स्वच्छता कर्मचा-यांची रिक्त पदे असल्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आली. ही पदे तातडीने भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
याच धर्तीवर वायफळे व चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही औषध पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता व मूलभूत सुविधांअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे आढळून आले. या सर्व समस्या केवळ एका केंद्रापुरत्या मर्यादित नसून तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये समान स्वरूपाच्या अडचणी असल्याचे चित्र या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाले. या संदर्भात आमदार रोहित पाटील म्हणाले, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमचील अडचणीची नोंद घेतली असून लवकरच संबंधित वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेऊन औषध पुरवठा वाढवणे, रिक्त पदे भरणे व सुविधा सुधारण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील.

त्रुटींवर लवकरच उपाययोजना करू
या पाहणी दौ-यावेळी चिंचणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य अक्षय पाटील, सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य विजय धेंडे, ज्येष्ठ नेते अविनाश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्राथमिक पाहणी दौऱ्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीवर लवकरच उपाययोजना होऊन दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Kolhapur News : प्रशासनाचा हलर्जीपणा,पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव; गावकऱ्यांचा संताप विकोपाला

Web Title: Sangali newsproblems of primary health centers on the agenda will hold a meeting with senior officials mla rohit patils inspection tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.