Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

सांगलीच्या जत तालुक्याची ओळख असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी जात म्हणून मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे मेंढीच्या शास्त्रीय संवर्धनाला आणि स्थानिक मेंढीपालन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 02:55 PM
Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Follow Us
Follow Us:
  • माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी जातीचा दर्जा
  • शास्त्रीय संवर्धन आणि शुद्ध पैदास करण्याचा मार्ग मोकळा
  • सांगलीतील मेंढीपालन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि धिप्पाड शरीरयष्टी, जलद वजनवाढ तसेच प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरोने, कर्नाल यांनी या जातीला ‘न्यू इंडिजिनस ब्रीड’ म्हणून मान्यता देत स्वतंत्र अॅक्सेशन नंबर प्रदान केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश आले असून सांगली जिल्ह्यातील मेंढीपालन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

संशोधन आणि शुद्ध पैदास करण्यासाठी मार्ग झाला मोकळा

७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या आयसीएआरच्या १४ व्या ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या बैठकीत माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जात म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना याबाबतचे अधिकृत पत्र पाठविले. जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे, माडग्याळ परिसरासह आटपाडी तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागांत वर्षानुवर्षं माडग्याळ मेढीचे पालन केले जाते. या मेंढीला स्वतंत्र जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने तिचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, संशोधन आणि शुद्ध पैदास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी या मान्यतेचे स्वागत केले.

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

शास्त्रीय संवर्धनाला चालना मिळण्यास मदत

राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र जात म्हणून नोंद झाल्यामुळे माडग्याळ मेंढीचे आनुवंशिक संवर्धन आणि शुद्धता राखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करता येणार आहेत. संकरित पैदासीमुळे मूळ जातीची वैशिष्ट्ये नष्ट होण्याचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून माडग्याळ मेढीच्या पैदास, संशोधन आणि मेंढीपालकांच्या विकासासाठी विविध योजना व निधी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ मेढी व बोकडांना स्वतंत्र ओळख आणि बाजारमूल्य मिळण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा स्थानिक मेंढीपालकांना होऊ शकतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Sangli madgyal sheep recognized nationally as indigenous breed maharashtra sheep farming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Sangli
  • sheep

संबंधित बातम्या

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
1

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
2

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
3

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
4

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.