Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदची आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींसाठी ७, मागास प्रवर्ग १६ आणि ३८ खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 13, 2025 | 06:39 PM
Sangli Zilla Parishad reservation draw for local body elections 2025

Sangli Zilla Parishad reservation draw for local body elections 2025

Follow Us
Follow Us:
प्रवीण शिंदे : सांगली : सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि १३) आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ६१ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींसाठी ७, मागास प्रवर्ग १६ आणि ३८ खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली. यावेळी महसूल जिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाल्याप्रमाणे आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आले, रियांश अभिजीत कांबळे आणि शौर्य अभिजीत कांबळे, अभिज्ञा अभिजीत कांबळे या जुळ्या भावंडांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरुवातीला अनुसूचित जातीच्या ७ जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये ४  महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका आदेशानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता एकूण देय जागांपैकी २७ टक्के जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यामध्ये १६ जागांसाठी सोडत काढली त्यापैकी ८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत काढून उर्वरित ३८ जागा खुल्या राहिल्या. त्यापैकी १९ महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मिरज तालुक्यात चार जागा एस.सी महिलांसाठी

अनुसूचित जातीच्या ७ जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये ४  महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार म्हैसाळ ( एस), मालगाव, कवलापूर, बेडग आशा चार ठिकाणी महिला अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण पडले. उर्वरित रांजणी, उमदी आणि सावळज या जागी पुरुषांना संधी मिळणार आहे.
अध्यक्ष पदाचे दावेदार 
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी यापूर्वीच सर्वसाधाण महिला पदाचे आरक्षण पडले आहे, यामध्ये मीनाक्षी महाडिक, हर्षदा महाडिक, रेणुकादेवी देशमुख, शितल बाबर, सोनिया बाबर, मोहिनी खोत, देवयानी नाईक, अश्विनी नाईक, भाग्यश्री शिंदे, मेघा कचरे, वैशाली कदम, संगीता पाटील, सुप्रिया पाटील अशी नावे चर्चेत आहेत.

वाळवा अन् मिरजेत महिलाराज 

वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यात प्रत्येकी ११ गट आहेत. या दोन्ही तालुक्यात महिलांसाठी एकूण १५ जागा आरक्षित आहेत. यात मिरज तालुक्यात आठ तर वाळवा तालुक्यात सात महिला सदस्य असतील.
तासगावात पाच गट सर्वसाधारणसाठी
तासगाव तालुक्यातील सहापैकी पाच गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये थेट महिलांसाठी एकही गट आरक्षित नाही.  मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून महिला सदस्य येऊ शकतात. कडेगाव तालुक्यात चारही गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यात तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 
जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे- 
जिल्हा परिषद गट  आरक्षण
आटपाडी (४) : 
  • दिघंची  – ना. मा. प्र.
  • करगणी – सर्वसाधारण
  • निंबवडे  – सर्वसाधारण महिला
  • खरसुंडी  – सर्वसाधारण
जत (९) : 
  • जाडर बोबलाद -सर्वसाधारण महिला
  • उमदी   -अनुसूचित जाती
  • शंख     -सर्वसाधारण महिला
  • दरीबडची  -सर्वसाधारण
  • मुचंडी  -ना. मा. प्र.
  • बनाळी  -सर्वसाधारण
  • शेगाव   -ना. मा. प्र.
  • डफळापुर  -सर्वसाधारण महिला
  • बिळूर   -ना. मा. प्र. महिला
खानापूर (४) : 
  • नागेवाडी  -सर्वसाधारण महिला
  • लेंगरे  -सर्वसाधारण महिला
  • करंजे  -सर्वसाधारण महिला
  • भाळवणी -सर्वसाधारण
कडेगांव (४): 
  • तडसर   -ना. मा. प्र. महिला
  • कडेपूर  -ना. मा. प्र. महिला
  • वांगी  -सर्वसाधारण महिला
  • देवराष्ट्रे  -ना. मा. प्र. महिला
तासगाव (६) : 
  • मांजर्डे     -सर्वसाधारण
  • सावळज   -अनुसूचित जाती
  • विसापूर  -सर्वसाधारण
  • येळावी  -सर्वसाधारण
  • चिंचणी  -सर्वसाधारण
  • मणेराजुरी -सर्वसाधारण
कवठेमहांकाळ (४) : 
  • ढालगाव   -ना. मा. प्र.
  • कुची     -ना. मा. प्र.
  • देशिंग   -सर्वसाधारण महिला
  • रांजणी  -अनुसूचित जाती
पलूस (४) : 
  • कुंडल    -सर्वसाधारण
  • दुधोंडी   -सर्वसाधारण महिला
  • अंकलखोप   -ना. मा. प्र.
  • भिलवडी  -सर्वसाधारण
वाळवा (११) : 
  • रेठरे हरणाक्ष  -सर्वसाधारण महिला
  • बोरगाव   -ना. मा. प्र. महिला
  • कासेगाव  -सर्वसाधारण महिला
  • वाटेगाव  -सर्वसाधारण महिला
  • पेठ   -ना. मा. प्र. महिला
  • वाळवा  -ना. मा. प्र.
  • कामेरी  -सर्वसाधारण
  • चिकुर्डे  -सर्वसाधारण
  • बावची  -सर्वसाधारण
  • बागणी -सर्वसाधारण महिला
  • येलूर -सर्वसाधारण महिला
शिराळा (४) : 
  • पनुंब्रे तर्फ वारुण -सर्वसाधारण महिला
  • वाकुर्डे बुद्रुक  -सर्वसाधारण महिला
  • कोकरूड  -सर्वसाधारण
  • मांगले  -सर्वसाधारण
मिरज (११) : 
  • भोसे  -सर्वसाधारण
  • एरंडोली  -सर्वसाधारण महिला
  • आरग  -सर्वसाधारण महिला
  • बेडग  -अनुसूचित जाती महिला
  • मालगाव  -अनुसूचित जाती महिला
  • कवलापूर  -अनुसूचित जाती महिला
  • बुधगाव   -ना. मा. प्र. महिला
  • कसबे  डिग्रज  -सर्वसाधारण
  • कवठेपिरान – ना. मा. प्र. महिला
  • समडोळी  -ना. मा. प्र.
  • म्हैसाळ  -अनुसूचित जाती महिला

Web Title: Sangli zilla parishad reservation draw for local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • political news
  • sangli news

संबंधित बातम्या

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
1

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
2

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
3

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली
4

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.