नीलेश घायवळच्या अडचणीत वाढ (फोटो- सोशल मीडिया)
निलेश घायवळला मिळणार इंटरपोलची नोटीस
भारत सरकारकडून होणार पाठपुरावा
पोलिसांनी सुरू केल्या वेगाने हालचाली
पुणे/Crime News: कुख्यात निलेश घायवळ याला थेट आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना (इंटरपोल) मार्फत ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात आली आहे. भारत सरकारशी समन्वय साधून घायवळला ब्लु कार्नर नोटीस बजावण्यात आली आहे. घायवळ सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा ठावठिकाणा निश्चित होत नसल्यामुळे, अखेरीस तपास यंत्रणांनी इंटरपोलकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी धाव घेतली आहे. त्या मागणीनुसार इंटरपोलने ही महत्त्वपूर्ण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ म्हणजे काय?
इंटरपोलकडून जारी केल्या जाणार्या सात रंगांच्या नोटिसांपैकी ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही नोटीस थेट अटक करण्याचा आदेश देत नाही (अटकेसाठी ’रेड कॉर्नर नोटीस’ वापरावी लागते), परंतु त्याचा उद्देश हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. एखाद्या फरार व्यक्तीची ओळख, तिचा सध्याचा ठावठिकाणा आणि ती कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे, याबद्दलची माहिती गोळा करणे, हे या नोटीसचे मुख्य उद्दिष्ट असते.
या नोटीसमुळे इंटरपोलचे सदस्य असलेले तब्बल 196 देश तात्काळ सक्रिय होतात. याचा अर्थ असा की, गुंड निलेश घायवळ जगात कोणत्याही देशात लपून बसलेला असला तरी, तो एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये दिसल्यास, त्या देशातील स्थानिक पोलीस यंत्रणांना त्वरित त्याची माहिती इंटरपोल आणि भारताला कळवणे बंधनकारक ठरते. थोडक्यात, ही नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या गुन्हेगाराला ’वॉचलिस्ट’वर टाकणे असे म्हटले जाते.
गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल मोक्काच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या गुन्ह्यात निलेश घायवळचा भाऊ तसेच पिस्तूल प्रकरणात चर्चेत आलेला सचिन घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
कोथरूड भागात कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीकडून एका तरुणावर शुल्लक कारणावरून गोळीबार तसेच दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले होते. या गुन्ह्यात निलेश घायवळचा समावेश समोर आल्यानंतर त्यालाही या गुन्ह्यात आरोपी केले होते. याच गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्याकडून सुरू होता.