• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sangram Thopte Sanjay Jagtap Join Bjp Challenge To Mp Supriya Sule In Baramati

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

Baramati: भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2025 | 02:35 AM
थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

खासदार सुप्रिया सुळे (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती/अमोल तोरणे:  भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसची सोडचिट्टी घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी देखील भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याने बारामती लोकसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, त्यातच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने देखील भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचा बारामती लोकसभा मतदारसंघातील वाढलेला जनाधार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती लोकसभेची जागा महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी ही चुरशीची लढत देशात गाजली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची तर शरद पवार यांच्या दृष्टीने ही अस्तित्वाची होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पराभव करण्याचा भाजप महायुतीचा डाव फसला. गेली दहा वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघात अधिक ताकद लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे.

स्वकियांमधील लढाईत सुळेंना फायदा

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला होता. त्यावेळी व्हीआयपी नेत्यांच्या प्राबल्याखाली असलेल्या मतदार संघाची जबाबदारी भाजपने विविध केंद्रीय मंत्र्यांकडे दिली होती. यामध्ये सितारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदार दिली होती. सितारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या मतदार संघाचा आढावा घेतला होता. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपची ही मोहिम थांबली होती. सुनेत्रा पवार यांना महायुतीने उमेदवारी देऊन एक प्रकारे अंदाज घेतला. स्वकियांमधील लढाईत फायदा सुप्रिया सुळे यांनाच झाला. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मतदारसंघातील विविध संस्थांवर प्राबल्य

भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर इंदापूर विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने अपक्ष लढलेले प्रवीण माने यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. नुकताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी देखील अनपेक्षितरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान संग्राम जगताप व संजय जगताप विद्यमान आमदार नसले तरी, त्यांचे आपल्या विधानसभा मतदारसंघात विविध संस्थांवर असलेले प्राबल्य पाहता भाजपची ताकद त्यामुळे वाढली आहे. या दोन नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेमध्ये मोठी मदत केली होती. आघाडीचा धर्म त्यांनी एकनिष्ठेने पाळला होता. आता हे दोन नेतेच भाजपबरोबर गेले आहेत. इंदापूरचे प्रवीण माने देखील भाजपसबत गेले आहेत.  इंदापूरचे माजी आमदार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असले तरी ते देखील भाजपकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

महाविकास अाघाडीकडे एकही अामदार नाही

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा विचार करता पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, भोर-वेल्हा मतदार संघात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर, दौंडमध्ये भाजपचे ॲड राहुल कुल, इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्याच्या स्थितीला महाविकास आघाडीसोबत एकही विद्यमान आमदार नाही. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील वगळता एकही प्रभावी नेता महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात दिसून येत नाही. त्यामुळे ही राजकीय परिस्थिती खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी काळामध्ये अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थोड्या दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बारामती लोकसभा मतदारसंघासह पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sangram thopte sanjay jagtap join bjp challenge to mp supriya sule in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: देवाभाऊ’साठी कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या? रोहित पवारांनी शोधून काढलं
1

Rohit Pawar News: देवाभाऊ’साठी कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या? रोहित पवारांनी शोधून काढलं

Maratha Reservation: लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला…”
2

Maratha Reservation: लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला…”

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ज्यांची हकालपट्टी केली आता त्यांचीच ‘घरवापसी’ केली
3

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ज्यांची हकालपट्टी केली आता त्यांचीच ‘घरवापसी’ केली

Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य
4

Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका….! दिवसाची सुरुवात आनंददायी होण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका….! दिवसाची सुरुवात आनंददायी होण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल

दहशतवादाला पाठिंबा देतायत ट्रम्प? पहिले तालिबान, मग सीरिया आणि आता हमासशी हातमिळवणी; नेमकं चाललंय काय?

दहशतवादाला पाठिंबा देतायत ट्रम्प? पहिले तालिबान, मग सीरिया आणि आता हमासशी हातमिळवणी; नेमकं चाललंय काय?

GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, महागाईचा धोका नाही, अर्थमंत्री काय म्हणाल्या? जाणून घ्या

GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, महागाईचा धोका नाही, अर्थमंत्री काय म्हणाल्या? जाणून घ्या

Devendra Fadnavis: रामोशी-बेडर समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज अन् उद्योग-व्यवसायासाठी….

Devendra Fadnavis: रामोशी-बेडर समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज अन् उद्योग-व्यवसायासाठी….

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.