Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना सदर आंदोलनाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीनुसार कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार काम दिले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 12:01 PM
म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

Follow Us
Follow Us:

म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक आपल्याला घरगड्याप्रमाणे वागणूक देऊन लज्जास्पद बोलत आहेत, त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी करुनही मुख्याधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. उलट त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून कर्मचाऱ्यांवरच अन्याय करत असल्याचा आरोप या सफाई कर्मचाऱ्यांनी केला. या सर्वांनी पालिकेच्या समोरच प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला महाराष्ट्र जननिकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सचिव किशोर धुमाळ, म्हसवडचे माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी झाले आहेत. म्हसवड पालिकेत २१ कायम सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ५ कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले असून, यामध्ये नितीन सरतापे, लैला गजानन सरतापे, निता सुनील चव्हाण, कल्पना सुधीर चव्हाण व अर्चना विनोद सरतापे आदीजण सहभागी झाले आहेत.

दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना सदर आंदोलनाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीनुसार कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार काम दिले जात आहे, तर आरोग्य निरीक्षक यांच्याकडे त्यांचा थेट संबंध ही येत नाही. यामध्ये मुकादम आता मध्ये आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बिनबुडाचे आरोप करुन पालिकेची बदनामी करु नये, त्यांनी मागणी केल्यानुसार पालिकेने विषाखा समितीकडूनही संबधित आरोग्य निरीक्षकाची चौकशी केली असून, त्या समितीनेही आरोग्य निरीक्षक यामध्ये निर्दोष असल्याचा अहवाल पालिकेला सादर केला आहे.

तासगावातही उपोषण

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी बलगवडे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनी गायरान गट क्रमांक 180 आणि 182 मधील सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि प्रस्तावित सोलार प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

हेदेखील वाचा : “मी माझा जीव देईन पण झाडे तोडू देणार नाही…”,नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याविरुद्ध सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका

Web Title: Sanitation workers begin hunger strike unto death against mhaswad municipal administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
1

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा
2

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
4

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.