Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Satara News: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पहिली ठिणगी वाई तालुक्यातून पडली असून, आता ही ठिणगी अधिक मोठ्या आंदोलनात रूपांतरित करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे, असेही यावेळी समन्वयकांनी स्पष्ट केले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 04, 2026 | 05:32 PM
Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Satara Gazette, Satara News

Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Satara Gazette, Satara News

Follow Us
Follow Us:
  • वाई शहरातील शिवतीर्थावर शेकडो मराठा कार्यकर्ते एकत्र आल्याने अर्धा तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प
  • ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आणि ‘सातारा गॅझेट’च्या मागणीसाठी परिसरात मोठी घोषणाबाजी
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखून सातारा जिल्ह्यातील दोन्ही छत्रपतींनी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी
Satara News Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी सातारा गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाई तालुका सकल मराठा समाज आक्रमक झाला. वाई शहरातील शिवतीर्थ, न्यायालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत महाबळेश्वर-वाई मार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज दादा जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सातारा गॅझेट तातडीने लागू करण्याचा आदेश काढावा, अशी आक्रमक मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात छत्रपतींची गादी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील दोन्ही छत्रपतींनी पुढे यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध करत आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, मराठा समाजाच्या मागण्यांवर लवकर तोडगा निघाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. मराठा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत, “आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा असून, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर यापुढील आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल,” असा इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पहिली ठिणगी वाई तालुक्यातून पडली असून, आता ही ठिणगी अधिक मोठ्या आंदोलनात रूपांतरित करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे, असेही यावेळी समन्वयकांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता वाई पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनांमधून वाई पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.पोलिसांची सतर्कता आणि मराठा आंदोलकांमधील समन्वयामुळे आंदोलनाला कोणतेही गालबोट लागले नाही. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.

या आंदोलनातून वाई तालुका सकल मराठा समाजाने सरकारला थेट संदेश दिला असून, मराठा समाजाची मागणी केवळ घोषणांपुरती राहणार नसून निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवला जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. शिवतीर्थ येथे आंदोलनाची सांगता करताना सातारा गॅझेटचा तात्काळ आदेश काढावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

सरकारने या मागणीची दखल घेतली नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक स्वरूपाचे असेल, असा स्पष्ट इशारा मराठा समन्वयकांनी दिला. वाईच्या रस्त्यावर उमटलेला हा एल्गार आता सातारा जिल्ह्यातील मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Satara gazette maratha reservation wai rasta roko in support of manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Satara News

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष
1

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
3

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
4

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.