Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

तामखडा शिवारातील क्षेत्राच्या मोजणीसाठी आज प्रशासनाचा मोठा फौजफाटा बावधन येथे दाखल झाला होता. मात्र, मोजणीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2026 | 01:23 PM
Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Follow Us
Follow Us:

वाई : वाई शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर बावधन गावातील तामखडा क्षेत्राच्या वादावरून सुरू असलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ८० टक्के दिव्यांग असलेला शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही न घेता उपोषणाला बसला असताना प्रशासनाने अद्याप या प्रश्नाची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

डोळ्यांनी अंध आणि ८० टक्के दिव्यांग असलेला हा शेतकरी आपल्या हक्कासाठी उपोषण करत आहे. मात्र, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असतानाही प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ‘दिव्यांग’ शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावे लागते, यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तामखडा शिवारातील क्षेत्राच्या मोजणीसाठी आज प्रशासनाचा मोठा फौजफाटा बावधन येथे दाखल झाला होता. मात्र, मोजणीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

२०२२ मध्ये झालेल्या चुकीच्या नकाशाच्या आधारे गट तयार करण्यात आला असून, त्यातून सुमारे १० एकर क्षेत्र खाणीसाठी मंजूर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, ज्या गटाच्या आधारे ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली, तो गटच चुकीच्या अथवा बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. ही बाब शेतकरी आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर परिस्थिती चिघळली या पार्श्वभूमीवर तामखडा शिवारात मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या.

अकोल्यात शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार

दुसरीकडे, पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असताना शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने गुरुवारी बोरगाव खुर्द-डाबकी जहागीर मार्गालगत थेट शेताच्या बांधावर चार तास आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी काळ्या फिती बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

नसरापूरनंतर मावळ हादरलं ! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

Web Title: 1500 villagers stay at tamkhada shivara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Agitation News
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
1

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
2

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद
3

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
4

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.