Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी; CM फडणवीसांकडून चौकशीचे निर्देश

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा रद्द करण्याची संजय बाळा भेगडे यांनी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 11:40 AM
Sanjay Bala Bhegade Demands Cancellation of Vadgaon Nagar Panchayat Development Plan

Sanjay Bala Bhegade Demands Cancellation of Vadgaon Nagar Panchayat Development Plan

Follow Us
Follow Us:
  • वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडावरुन वाद
  • माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
  • प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश
Pune News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव नगरपंचायतच्या (Maval News) प्रशासकीय कार्यकाळात प्रसिद्ध करण्यात आलेला विकास आराखडा नागरिकांवर अन्यायकारक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही भेगडे यांनी दिली. (Pune News)

यासंदर्भात भेगडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले होते. वडगाव नगरपंचायतच्या २०१८ मधील कार्यकाळात प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध न करता कार्यकाळाच्या अखेरीस तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी संगनमत करून त्यामध्ये फेरबदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासक नियुक्तीनंतर २२ फेब्रुवारी २०२४ रोजी हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला.

हे देखील वाचा : पाच वर्षांनी वनराणी पुन्हा धावली! बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची सफर

प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आराखड्यात भ्रष्टाचार, पक्षपात आणि नागरिकांवर अन्यायकारक आरक्षणे असल्याने तब्बल ६५० हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींवर झालेल्या सुनावणी प्रक्रियेदरम्यान धनदांडगे व बिल्डर यांना फायदा होईल अशा पद्धतीने बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. धार्मिक स्थळे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षणे टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

काही आर्थिक व्यवहार झालेल्या मागण्या मान्य करून इतर हरकती फेटाळण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हा आराखडा रद्द करण्यासाठी वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी केली होती.

या आराखड्यातील गैरव्यवहार व पक्षपात लक्षात घेता तो पूर्णपणे रद्द करून नवा, पारदर्शक आणि न्याय्य विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री भेगडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा

दरम्यान, प्रसिद्ध झालेला हा विकास आराखडा खरोखरच रद्द होणार का, रद्द झाल्यास त्याचे परिणाम काय होणार, याकडे वडगावकर नागरिकांचे लक्ष लागले आहे. काहींना हा आराखडा सोयीस्कर असताना काहींसाठी तो नुकसानकारक ठरत असल्याने अंतिम निर्णय काय होतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय (बाळा) भेगडे, माजी राज्यमंत्री म्हणाले की, “वडगाव नगरपंचायतचा विकास आराखडा हा वडगावकर नागरिकांच्या दृष्टीने अन्यायकारक असून तो केवळ धनदांडगे व बिल्डरांच्या हिताचा आहे. त्यामुळे हा आराखडा तात्काळ रद्द करून न्याय्य व पारदर्शक आराखडा तयार करण्यात यावा.”

Web Title: Sanjay bala bhegade demands cancellation of vadgaon nagar panchayat development plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • maval news
  • pune news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी
1

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
2

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार
3

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
4

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.