Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2026 | 12:21 PM
पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार 'ही' मोठी कारवाई

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार 'ही' मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे. ड्यूटीवर असताना नेमप्लेट लपवल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने असे अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत असतात या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

 

पुणे शहरात वाहतूक नियमन किंवा कारवाईदरम्यान अनेक पोलिस कर्मचारी गणवेशाच्या वरच्या खिशात मोबाईल फोन ठेवतात. त्यामुळे त्यांच्या नावाची पाटी (नेमप्लेट) पूर्णपणे झाकली जाते. अथवा, नेमप्लेट खाली लटकेल (नाव दिसणार नाही) अशा पद्धतीने ती लावली जाते. परिणामी, संबंधित पोलिस कर्मचार्‍याचे नाव नागरिकांना दिसत नाही. त्यांची ओळख पटविणे कठीण होते. काही ठिकाणी कारवाई करतानाच नेमप्लेट झाकण्याची पद्धत रूढ झाल्याचेही वरिष्ठांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर तसेच शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा तसेच इतर विभागांना लेखी आदेश पाठविले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍याची नेमप्लेट कर्तव्यावर असताना स्पष्टपणे दिसेल, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर टाकण्यात आली आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पोलिस प्रशासनाने यापूर्वी नेमप्लेट स्पष्ट ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने वारंवार आढळून आले. त्यामुळे आता जाणूनबुजून नेमप्लेट झाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्‍यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा आदेशातून देण्यात आला आहे. पोलिस दलात शिस्त आणि उत्तरदायित्व वाढविण्यासोबत नागरिकांना समोर असलेल्या पोलिस कर्मचार्‍याची ओळख सहज पटावी, या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. प्रशासन विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

आदेशात नेमके काय?

  • गणवेशावरील नेमप्लेट नेहमी स्पष्ट दिसणे बंधनकारक.
  • वरच्या खिशात मोबाईल किंवा अन्य वस्तू ठेवून नेमप्लेट झाकता येणार नाही.
  • नेमप्लेट जाणूनबुजून झाकल्यास शिस्तभंगाची कारवाई.

Web Title: Action will be taken against police personnel who conceal their nameplates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
1

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
2

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
3

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
4

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.