काय घडलं नेमकं?
शुक्रवारी पोलिसांना रेल्वे स्टेशन परिसरात भयानक अवस्थेत एका महिलेचा मृतदेहा आढळल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वाशीम रेल्वे पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आले. एका ट्रकजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. एका मोठ्या दगडाने महिलेचं डोकं ठेवण्यात आल्याचे निर्दर्शनात आले. यावरून हत्येचं प्रकरण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. महिलेच्या शरीरावरील कडपें देखील अस्ताव्यस्त आणि फाटलेलंय अवस्थेत होते. त्यामुळे मृत महिलेसोबत जबरदस्ती करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचं वय 45 ते 50 वर्ष असेल असा अंदाज वर्तवला आहे. वाशीम पोलिसांनी आरोपींबद्दल कोणताही पुरावा मिळवण्यासाठी वाशीम पोलिसांनी घटनास्थळी एक श्वान देखील आणलं, मात्र त्यातून कोणताच सुगावा हाती लागला नाही. अद्याप मृत महिलेची ओळख समोर आली नसून त्याचा तपास सुरु आहे. तसेच महिलेच्या हातावर ‘छाया मोहन’ असं नाव गोंदवल्याची माहिती आहे. वाशीम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास
Ans: वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात, एका ट्रकजवळ.
Ans: डोकं दगडाने ठेचलेलं असून कपडे अस्ताव्यस्त आढळले.
Ans: श्वान पथक वापरले, गुन्हा दाखल; तपास सुरू आहे.






