Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ – आमदार नितेश राणे

महाराष्ट्राच्या राजकारणात सूर्याची पिसाळ हे संजय राजाराम राऊत आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2024 | 05:12 PM
संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ – आमदार नितेश राणे
Follow Us
Close
Follow Us:

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती दाखवलेला आहे आणि त्या सुरीवर लिहिलेलं आहे की संजय राजाराम राऊत! परत शिक्कामोर्तब होतोय की, महाराष्ट्राच्या राजकारणात सूर्याची पिसाळ हे संजय राजाराम राऊत आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.

पहिले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भांडण लावून ठाकरेंचं घर फोडलं. तेव्हाही राज ठाकरेंच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊतची गाडी फोडलेली. त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सगळ्या आमदारांनी उठाव केला की, शिवसेना वाचवा. तेव्हा त्या चाळीस आणि तेरा खासदारांचा रोष हा संजय राजाराम राऊत यांच्यावर होता. संजय राऊत या माणसाने शिवसेनेमध्ये आग लावली आणि त्यामुळे आम्हाला उठाव करायला लागला. नंतर शरद पवारांच्या घरामध्ये जेव्हा अजित पवार यांनी भूमिका घेतली तेव्हाही सगळ्यांचा रोष या संजय राजाराम राऊत यांच्यावर आलेला आहे. आता प्रकाश आंबेडकर आणि यानंतर जसं मी वारंवार बोलतोय तुम्ही माझा हा व्हिडीओ सेव्ह करून ठेवा की, काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे.

पुढे ते म्हणाले की, उंबरठ्यावर उभे आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे. त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे. हे तुम्हाला त्यांच्याच तोंडाने ऐकायला भेटेल. म्हणजे खंजीर खुपसण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे. प्रत्येक बाबतीमध्ये हे खरे आणि बाकी सगळे खोटारडे म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान वाचवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरचे व्यक्ती आहेत. त्यांच्याच घरच्या व्यक्तीला हे संजय राजाराम राऊत पाठीत खंजीर खुपसत आहे. मग संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करताय, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.

खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा अपमान कोणी केला असेल तर तो संजय राजाराम राऊतनी केलेला आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब आम्ही नाही, प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यापुढे उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने मातोश्रीचे महत्व कमी करत करत इथ पर्यंत आणलेलं आहे. यापुढे हम दो, हमारे दो हे एवढंच ठेवण्यापर्यंत संजय राजाराम राऊत यशस्वी होईल, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

अंबादास दानवे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मिळालेल्या माहितीनुसार अंबादास दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत. संघाच्या शाखेमध्ये जायचे असे माहिती देखील मिळालेली आहे. संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेला व्यक्ती संघातून आणि परिवारातून कधीही लांब जात नाही. असा अनुभव असल्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असेही आमदार राणे म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत खैरे ती सीट जिंकू शकत नाहीत. २०१९ ला ते मोठ्या फरकाने पडले होते. गंज लागलेल्या शिक्क्याला वारंवार उद्धव ठाकरे वापरत आहेत. म्हणजे एवढं सिद्ध होत की, केवळ संजय राऊतची पॅन्ट साफ करून नाही तर आदित्यचे पाय धरून लागणार आहेत, असा टोलाही श्री. राणे यांनी लगावला आहे.

आपल्या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाप्रमाणे आपण सगळे चालतो. कायद्यापलीकडे आणि कायद्यापेक्षा मोठा हा कोणचं नाही. मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा दुसरा कुठलाही व्यक्ती असो. जो न्याय सामान्य भारतीय नागरिकाला लागतो. तोच न्याय काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांना लागतो. सामान्य नागरिक अगर ३१ मार्च अनुसार जर आपल्या आपल्या पद्धतीने कर भरत असतील. नियम पळत असतील. तर काँग्रेस पक्ष हे काय इटली नाहीये. तुम्हाला सगळ्या सवलती मिळण्यासाठी, म्हणून तुम्हाला या भारतामध्ये नियम पाळायचे नसतील तर तुमच्यासाठी जेलचे दरवाजे उघडे आहेत. म्हणून जर काय काँग्रेसने केलंय तेच भरतायत त्यांच्या काळामध्ये असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.

बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना आ. राणे म्हणाले, अजूनपर्यंत सागर बंगल्यावरून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही. जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे. ते बच्चू कडू नावाच पण वादळ आमचा सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबू शकेल, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

सर्व पक्ष राहिले किती आता. त्यांच्यामध्ये केजरीवाल नाहीत, झारखंडचे मुख्यमंत्री नाहीत, लालूप्रसाद यादव नाहीत, ममता बॅनर्जी यांचा भरोसा नाही, अखिलेश यादव दुसऱ्या तोंडाने बोलतात. त्यामुळे त्यांच्या सर्व पक्षाचा अर्थ आता बदलावा लागेल, असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे. रामलीला मैदानावर कुठलीच रामलीला होणार नाही. ते सगळं रावणाचं घर झालेलं आहे. म्हणून त्या सभेला काही अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा होऊ शकला नाही. जो माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा होऊ शकले नाही. जो माणूस शरद पवार यांचा होऊ शकले नाही. जो माणूस स्वतःच्या घरचा होऊ शकले नाही. तो आंबेडकरांचा काय होणार? असा सवालही आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तर ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे नावाचा प्राणी कधीच कोणाचा होऊ शकत नाही. सांगलीच्या जागेबाबत व्यवहार पूर्ण झाला का? हा राजकीय विषय नाही, तर आर्थिक विषय आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावं, असा टोलाही आ. राणे यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काय दिवे लावले असे प्रश्न विचारण्यापेक्षा जरा गावागावात जाऊन विचारा, पहा आणि त्याच्या गावांमध्ये उजेड कसा आणलेला आहे. त्या गावांचा विकास कसा केलेला आहे. वाटल्यास त्यांना ते पाहण्यासाठी बाईक वरून बसवून फिरवतो. तेव्हा दाखवू केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय दिवे लावले आहेत. कारण त्याच दिव्यांच्या जोरावर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विनायक राऊत निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवे नसते तर विनायक राऊत दिसले पण नसते. विरोधकांना भाजप विरुद्ध लढण्यासाठी मुद्दे नाहीत. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध उबाठा आहे. ही कोणाची वैयक्तिक निवडणूक नाही. म्हणून उबाठाच्या नेत्यांनी हिंमत असेल तर विकासावर चर्चा करावी. आम्ही केव्हाही तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक राणे विरुद्ध उबाठा करायला देणार नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध उबाठा अशी निवडणूक लढत होईल. तुम्ही कितीही प्रयत्न केलात आणि कितीही वेगवेगळे प्रश्न निर्माण केलात किंवा वैयक्तिक स्टेटमेंट दिले तरी त्याला आम्ही वैयक्तिक स्टेटमेंट देणार नाही, असेही आ. नितेश राणे म्हणाले.

Web Title: Sanjay raut is suryaji pisal in maharashtra politics mla nitesh rane prakash ambedkar maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 05:12 PM

Topics:  

  • BJP
  • Loksabha Elections
  • Maharashtra Government
  • MLA Nitesh Rane
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Shivsena Thackeray Group
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.