i-only-listen-to-sharad-pawar-sanjay-raut-after-ajit-pawar-slams-him
येत्या 22 जानेवारील अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन (Ram mandir) आहे. जसे जसे दिवस जवळ येत आहे तसं गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र राम मंदिराबाबतच चर्चा होताना दिसत आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणातही विविध विषय चर्चिले जात आहेत तर काही नेते एकमेंकावर टिका टिपण्णी करताना दिसत आहे. नुकतचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हण्टलं की, “बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते?”, असा खोचक त्यांनी विचारला होता. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. नेमक काय म्हणाले संजय राऊत जाणून घ्या.
[read_also content=”विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा; कर्नाटकात शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा! https://www.navarashtra.com/india/students-suffer-from-food-poison-in-school-in-karnataka-nrps-497320.html”]
सजंय म्हणाले, “बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात. ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशी गर्जना उगाच दिली जात नाही. भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असं कुणाला म्हणताना ऐकलं आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली.”
माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, बाबरी कोसळताना शिवसेना कुठे होती? हे पाहायचे असेल तर बाबरी पाडल्यानंतर विशेष न्यायालयाने आरोपी ठरविलेल्यांची नावे वाचा. देवेंद्र फडणवीस वकील आहेत, त्यांनी आरोपपत्र एकदा पाहावे. मग त्यात किती शिवसैनिक आहेत, हे महाराष्ट्राला सांगावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. रामाचे श्रेय तुम्हालाच घ्या. पण प्रभू श्रीराम तुम्हाला श्रेय घेऊ देईल का? हे २०२४ ला कळेल.
“हजारो शिवसैनिक अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. दैनिक सामनावरच १५० खटले दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः लखनऊच्या सीबीआय न्यायालयात हजर झालेलो आहोत. मोरेश्वर सावे आणि अनेक आमदार, नगरसेवक त्यावेळी अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. आज भाजपासह असलेल्या शिंदे गटातील शेळ्या-मेंढ्या या त्यावेळेस तिथे नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत गेलेले असून ते अनेक मायावी रुपं धारण करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. २०२४ या शूर्पणखेचं नाकच कापू”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.