Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा, अडीच वर्षात १०० कोटीची…

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सध्या सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2024 | 12:19 PM
संजय राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा, अडीच वर्षात १०० कोटीची…
Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सध्या सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. मिंधेसरकारचे बाळराजे आहेत, त्यांना लिहिता वाचता येतं ना, असे म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले, ते नक्की सुशिक्षित आहेत का, बाळराजेंना लिहिता वाचता येतं ना, ते हाड वैद्य आहेत, त्यांनी कधी माणसांची की जनावरांची हाड तपासली, ते पाहा. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं, तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं,हे बाळराजेंना समजेल, असे म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे.

१०० कोटीची अडीच वर्षांत उधळणी केली

मागील काही वर्षांपासून श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५०० ते ६०० कोटी रुपये गोळा करण्यात आले, त्याबद्दल त्यांनी सांगावं. दहा वर्षांमध्ये मुख्यता अडीच वर्षात जी काही उधळपट्टी केली, ती सर्व १०० कोटीच्या वर आहे. सातपुते यांनी याची तक्रार केली होती, त्यावर आपण काही बोलात नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. हसायचं की रडायचं, पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागलं आहेत, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांवर टीका केली होती.

नरेंद्र मोदी यांची हवा तुम्हाला देखील लागली आहे.इधर-उधर की बात करो. तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावे जर तुम्ही देणार नसाल तर, आम्ही देऊ तसेच त्याबदल्यात सरकारने त्यांची कोणती कामे केली एक नंबर आणि दोन नंबरची. त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहेत त्यांनी खाजवत बसावे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, लोकशाहीमध्ये या देशात कोणीही निवडणूक लढू शकतो. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसशी कधीच बेईमानी केली नव्हती, उमेदवारी हा वेगळा विषय आहे. काँग्रेसची जी परंपरा आहे, ती तोडून ते वेगळी कोणतीच भूमिका घेणार नाहीत असे आम्हाला वाटतं. विशाल पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. नक्कीच आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकता, असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay raut targets srikant shinde 100 crores in two and a half years loksabha shrikant shinde eknath shinde nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Ekanath shinde
  • sanjay raut
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.