Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय शिरसाट यांची जहरी टीका; ‘एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे माणसात…’

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट यांनी ‘तुम्ही नरेंद्र साहेबांची बरोबरी करु नका’ असे उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 13, 2024 | 06:09 PM
संजय शिरसाट यांची जहरी टीका; ‘एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे माणसात…’
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर :  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार (State Govt) व केंद्र सरकारवर जहरी टीका केली. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Temple inauguration) हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ‘तुम्ही नरेंद्र साहेबांची बरोबरी करु नका’ असे उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

पत्रकार परिषद घेत मुंबईतील न्हावा शेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो. नको तिथे पाहायची त्यांना सवयच लागली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी देखील त्यांनी अशीच टीका केली होती. अशा बारीक गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि अटलजी चा फोटो का नव्हता? अटलजीचे नातेवाईक का नव्हते? हा उद्धव ठाकरे यांचा बालिशपणा आहे. बालिशपणा हाच शब्द त्यांना लागू होतो. अशा शब्दांत शिरसाट यांनी ठाकरेंना सुनावले.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिरात येण्यासाठी लिहिलेल्या पत्राबाबत शिरसाट यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, काळाराम मंदिरात राष्ट्रपतींना यांच्यामुळे निमंत्रण मिळणार आहे का? राष्ट्रपती थेट येऊ शकत नाहीत का? काळाराम मंदिरांची याची मालकी आहे का? काळाराम मंदिरात तुम्ही किती वर्षांनी जात आहात? मोदी साहेब काळाराम मंदिरात गेले याचंही यांना वावडं आहे. काळाराम मंदिरमध्ये उद्धव ठाकरे यापूर्वी किती वेळा गेले होते, हे त्यांनी सांगावं. तुम्ही मोदी साहेबांची बरोबरी करू नका, असं संजय शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या जागेसाठी जंग पछाडलं आहे. यावरुन शिरसाट यांनी टीका केली असून उद्धव ठाकरे आज 19 वर्षानंतर त्या शिवसेनेच्या शाखेत गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना माणसांत आणण्याचं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची ही पोहचपावती आहे. आता शिवसैनिक जवळ येतात. एकेकाळी आमदारांना जवळ यायला परवानगी नव्हती. हे परिवर्तन झालं त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहे. घराणेशाही वाक्य तुमच्यासाठी लागू होतं, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Web Title: Sanjay shirsat replies to uddhav thackeray on pm narendra modi political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 06:09 PM

Topics:  

  • President draupadi murmu
  • Sanjay Shirsat
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Nashik News: ठाकरेंचा भाजपला पहिला धक्का; नाशिकमध्ये दोन बडे नेते ठाकरे गटात प्रवेश करणार
1

Nashik News: ठाकरेंचा भाजपला पहिला धक्का; नाशिकमध्ये दोन बडे नेते ठाकरे गटात प्रवेश करणार

Sanjay Raut News: जैन समाजाच्या ट्रस्ट घोटाळ्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सगळं लवकर बाहेर काढणार? संजय राऊतांचा इशारा
2

Sanjay Raut News: जैन समाजाच्या ट्रस्ट घोटाळ्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सगळं लवकर बाहेर काढणार? संजय राऊतांचा इशारा

Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?
3

Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
4

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.