Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Wari 2026 : संत सोपानकाकांच्या पालखीच्या आगमनाने नीरा नगरी झाली विठ्ठलमय; १२६ दिंड्यांचे जल्लोषात स्वागत

संत सोपनकाकांच्या पालखी आज नीरा नगरीत पोहचताच पूर्ण परिसर अगदी भक्तीमय झाला. या सोहळ्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. पालखी रथातून उतरल्यानंतर पालखी स्थानिकांनी खांद्यावर घेतली

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 06:51 PM
Pandharpur Wari 2026 : संत सोपानकाकांच्या पालखीच्या आगमनाने नीरा नगरी झाली विठ्ठलमय; १२६ दिंड्यांचे जल्लोषात स्वागत
Follow Us
Follow Us:

नीरा नगरीत संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन गेले आहे. मांडकी येथून प्रस्थान झाल्यानंतर पालखी जेऊर येथील पिंपरे( खुर्द) मार्गेस नीरेत प्रवेशा केला. वाटेवर अनेक गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत टाळ- मृदंगाच्या तालावर पालखीचे स्वागत केले.

  • संत सोपानकाकांच्या पालखीचे नीरा नगरीत १२६ दिंड्यांसह जल्लोषात स्वागत; लाखो वारकऱ्यांनी केला विठ्ठल नामाचा गजर.
  • अहिल्या होळकर चौकापासून भाविकांनी पालखी खांद्यावर घेत मंदिरापर्यंत नेली; फुलांचा वर्षाव आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सोहळा रंगला.
  • यंदा ११ नव्या दिंड्यांची भर पडल्याने एकूण १२६ दिंड्या सहभागी; महाप्रसाद, पाणी व विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
  • नीरेतील मुक्कामानंतर संत सोपानकाकांची पालखी बारामती तालुक्यातील निंबुतकडे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
भाविकांची सकाळपासून गर्दी 

सकाळपासूनच भाविकांनी पालखीसाठी नीरेच्या रस्त्यांवर गर्दी केली होती. अहिल्या होळकर चौकापासून भाविकांनी पालखी रथातून उतरुन खांद्यावर घेतली. माऊली… माऊली.. च्या जयघोष केला. त्यानंतर भजन, नामस्मरण आणि टाळ- मृदंगाच्या सुरावटीत पालखी श्री विठ्ठल- रुक्मिणी यांना मंदिरात नेण्यात आले.

Ratnagiri News: रत्नागिरीचा कायापालट ठरला! ७ कोटींचे भव्य शॉपिंग सेंटर, पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी

उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेले वारकरी थकलेले दिसत होते. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी संत सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. दुपारच्या विश्रांतीदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या शिस्तीत दर्शनासाठी रांगा लावल्या.

पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, विश्रांतीची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. यामुळे वारकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला.

११ नवीन दिंड्यांची भर पडल्याने एकूण १२६ दिंड्या

संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आकर्षण वर्षागणिक वाढताना दिसत आहे. यंदा आणखी ११ नवीन दिंड्यांची भर पडल्याने एकूण १२६ दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. लाखाहून अधिक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारी करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. नीरेतील मुक्कामानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. विश्रांती पूर्ण झाल्यानंतर दुपारी पालखीने बारामती तालुक्यातील निंबुतकडे पुढील प्रवास सुरू केला. भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर संदेश देत हा सोहळा पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला ‘हा’ इशारा

Web Title: Sant sopankaka palkhi receives grand welcome in nira with 126 dindis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur

संबंधित बातम्या

Jejuri Warkari Accident : विठुरायाच्या दर्शनापूर्वीच मोठा अनर्थ! वारकऱ्यांना ट्रकने चिरडल्याचा थरारक VIDEO समोर
1

Jejuri Warkari Accident : विठुरायाच्या दर्शनापूर्वीच मोठा अनर्थ! वारकऱ्यांना ट्रकने चिरडल्याचा थरारक VIDEO समोर

Ashadhi Wari 2026 : विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू
2

Ashadhi Wari 2026 : विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या
3

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या

Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू
4

Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.