Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश

Ashadhi Wari 2026: निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 02, 2026 | 04:09 PM
राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

Follow Us
Follow Us:
  • संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस
  • मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश
  • विसावा स्थळांवर चिखल होऊ नये म्हणून तातडीने खडी टाकण्याबरोबरच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
Ashadhi Wari Sohla 2026 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पालखी मार्ग आणि विविध विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. पालखी सोहळा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा तसेच भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, प्रभाग अधिकारी अतुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. यासोबतच पालखी मार्गावरील अनधिकृत टपऱ्या व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांमुळे भाविकांना अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच, पालखीच्या विसावा स्थळांची पाहणी करताना मेट्रो कामांसाठी उभारलेले बॅरिकेड्स हटवणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विसावा स्थळांवर चिखल होऊ नये म्हणून तातडीने खडी टाकण्याबरोबरच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले.

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

आकुर्डी येथील खंडोबा चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामांमुळे पालखी मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खातरजमा करून रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आणि आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश दिले.

पालखी सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय असल्याने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यास महापालिकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

Web Title: Sant tukaram maharaj palkhi sohla 2026 pcmc preparation nigdi bhakti shakti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Pandharpur Ashadhi Wari
  • PCMC News
  • Sant Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?
1

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
2

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
3

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
4

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.