
Sara Vartak SagarKanya,alibaug news
असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण अलिबाग तालुक्यातील लहानश्या फोफेरी गावातील सरा वर्तक हिचे पाय पाळण्यात नाही तर पाण्यात दिसले. तिने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया तब्बल ३२ किमीचा अंतर अवघ्या ९ तास ३२ मिनिट मध्ये पार करून इतिहास घडवला. समुद्राच्या लाटा तसेच रात्रीचा अंधार तिला तिच्या इच्छा शक्तीला थांबवू शकला नाही. ध्येय डोळ्या समोर ठेवून हि चिमुरडी आई वडीलांचा अभिमान सार्थकी करून समुद्राला आपला मित्र करून लहान वयातच मोठी पदाक्रांत केली स्वत:चा नावावर सर्वात लहान जलतरण पटू होण्याचा मान मिळवला.
मोठे ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी मेहनत जिद्द तसेच शिष्ठ याच समीकरण जुळलं कि यश नक्कीच असते पण त्या मागे काही अनसीन हिरो ही असतात त्यांचा वाटा हि तेवढाच महत्वाचा. तिच्या कामगिरीच्या मागे तिचे प्रशिक्षक किशोर पाटील सुरज लोखंडे यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांना आधीच हेरलं होत कि सारामध्ये तो आत्मविश्वास आहे ती हे करू शकते. तसेच ती कुठलेही आव्हान लीलया पेलू शकते. म्हणूनच सारा ने ते आव्हान पूर्ण करून दाखवले.
Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते
सारा जेव्हा धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास पूर्ण करून पोहचली तेव्हा तिच्या स्वागताला तिचे कुटुंब, मित्र परिवार तसेच कुलाबा पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते जलतरण करताना समुद्रात बदल होत होते वारा आव्हान देत होता लाटा उंचउंच हवेत उडून तिला अडवू पाहत होता तरीही ती न घाबरता ते आव्हान पूर्ण केलं तिच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल कौतुक होत आहे तसेच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आई वडीलांना अश्रू अनावर झाले.
लेकीचे हे यश पाहून ते आपले आनंद आणि अश्रू दोन्ही हि लपवू शकले नाहीत. लहान वयातच तिने आपली मेहनत सार्थकी लावली. तिचे यश पाहून त्यांचेही डोळे पाणावले. साराच्या मूळ गावी हि तीच यश जल्लोष साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थांनाही ती आपल्या गावाची सुकन्या आहे याचा अभिमान होता. जेव्हा ती आपल्या आजोळी येईल तेव्हा तिचे भव्य स्वागत केलं जाईल.सर्वजण तिला आयडॉल म्ह्णून बघत आहेत
सारा चे ध्येय
तिला ऑलंपिक मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. आता पर्यंत सारा ने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकली आहेत. महाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या स्पर्धेत तिने ३ सिल्वर मेडल तसेच २ ब्राँझ मेडलची कमाई केली होती.
तू येडा आहेस का ? अलिबाग वरून आलोय का ? या वाक्यामागची खरी कथा