Sarasbagh Padwa Pahat program likely to be cancelled Pune News Update
Sarasbagh padwa pahat : पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पाडवा पहाट असा सूरमयी कार्यक्रम घेतला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या सारसबागेमध्ये होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. सारसबागेमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी जमत असतात. आकाशदिवे उडवत गाण्यांच्या मैफिलीसह ही दिवाळी पहाट साजरी होत असते. मात्र यंदा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. हा विरोध हिंदू संघटनांकडून दर्शवला जात असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील सारसबाग येथे शेकडो तरुण-तरुणी येत असतात. यावेळी मुलींसोबत छेडछाड केली जाते. सोशल मीडियावर या कार्यक्रमाला विरोध वाढत केला आणि त्याचा निषेध केला जात आहे. या कार्यक्रमामध्ये मुलींशी छेडछाड होते अन् धर्मविरोधी गाणी गायली जात असल्याचंही हिंदू संघटनांनी म्हणणं आहे. यामुळे संघटनांनी थेट आयोजकांना इशारा दिला. त्यामुळे पुण्यातील सारसबागेतील कार्यक्रमावर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समाजातून हिंदू संघटनांकडून होणारा वाढता विरोध अन् निषेध लक्षात घेत आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुणे पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर हा पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे करणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भातील तयारी आज सकाळपासून पुन्हा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांनी आयोजकांना थेट इशारा दिला आहे.
गेली 28 वर्षे आजपर्यंत कुठलीही अप्रिय घटना न घडता हा विनामूल्य कार्यक्रम हजारो पुणेकरांसाठी सर्वात लोकप्रिय ठरला होता. मात्र, सध्या समाजमाध्यमांवर सारसबागेतील काही व्हिडिओ प्रसारित होत आहे. यामुळे कार्यक्रमामध्ये मुली सुरक्षित नसल्याचे सांगितले आहे. दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजक युवराज शाह यांनी हा कार्यक्रम शहराच्या संस्कृतीचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. “हा कार्यक्रम पुण्याचं सांस्कृतिक प्रतीक आहे. यात कोणतेही राजकीय स्टंट नाहीत. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि पुण्याच्या संस्कृतिक परंपरा जिवंत ठेवाव्यात,” असं आवाहन युवराज शाह यांनी केलं आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात शनिवार वाड्यावरही धार्मिक तेढ
पेशाव्यांच्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यावरील नमाज पठानावरुन वाद निर्माण झाला आहे. शनिवार वाड्याच्या आवारामध्ये नमाज पठनाचा व्हि़डिओ व्हायरल झाला. यावरुन भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नमाज पठन केल्याच्या जागी गोमुत्र शिंपडून जागा शुद्धीकरण केली असल्याचा मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तर शनिवार वाडा ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसल्याचे इतर नेत्यांनी म्हटले आहे. पुण्यामध्ये यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाला असून यावरुन जोरदार राजकीय वाद सुरु असल्याचे देखील दिसत आहे. यानंतर आता सारसबागेमध्ये होणाऱ्या पाडवा पहाट कार्यक्रमावरुन देखील वाद सुरु आहे.