Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा

वीज मंडळाचे अधिकारी थकीत बिलांच्या नावाखाली थेट वीज जोडणी तोडण्यासाठी ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. यावेळी ग्राहकांशी अरेरावी करणे आणि दंड भरण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार वाढले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 07, 2026 | 04:17 PM
महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • कर्मचारी प्रत्यक्ष मीटरकडे न फिरता कार्यालयात बसूनच अंदाजे रीडिंग टाकत आहेत
  • अधिकारी ग्राहकांनाच मीटरचा फोटो काढून आणण्याच्या आणि ऑनलाईन बिल काढण्याच्या सूचना देत आहेत
  • अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे
 

MSEDCL Otur: महावितरण कंपनीच्या गलथान आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक प्रचंड हवालदिल झाले आहेत. चुकीचे मीटर रीडिंग, वेळेवर न मिळणारी बिले आणि वीज तोडण्याची धमकी देऊन केली जाणारी सक्तीची वसुली यामुळे ओतूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, जुन्नर तालुका मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष हेंमत पाटील डुंबरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, महिनाभरात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

घरात बसूनच अंदाजे रीडिंग?

अनेक ग्राहकांच्या तक्रारीनुसार, वीज मंडळाचे कर्मचारी किंवा ठेकेदार प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यासाठी येत नाहीत. अधिकारी कार्यालयात बसूनच अंदाजे रीडिंग टाकत असल्याने ग्राहकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ऑनलाईन मिळालेली बिले आणि प्रत्यक्ष मीटरमधील रीडिंग यामध्ये मोठी तफावत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.

 

ग्राहकांनाच ‘फोटो’ काढण्याच्या सूचना

या समस्या घेऊन कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बाळासाहेब एरंडे, सागर दांगट, अभिजित घोलप यांसह अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त केला की, “तुम्हीच मीटरचा फोटो काढून आणा आणि बिल ऑनलाईन काढा,” अशा सूचना देऊन त्यांना परत धाडले जात आहे. ज्या ग्रामीण भागातील ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांची यामुळे मोठी कोंडी होत आहे. आपले काम ग्राहकांवर ढकलण्याच्या या प्रकारामुळे महावितरणच्या निष्क्रियतेचा कळस गाठला गेल्याची टीका होत आहे.

प्रशासनाने ग्राहकांची लूट थांबवून कारभारात तत्काळ पारदर्शकता आणावी, अशी मागणी हेमंत पाटील डुंबरे यांनी केली आहे. महिनाभराच्या मुदतीत सुधारणा न झाल्यास ओतूर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा

वीज मंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनआंदोलनाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने मीटर रीडिंग आणि बिलिंगसाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे, मात्र हे ठेकेदार वेळेत कामे पूर्ण करत नाहीत. दुसरीकडे, वीज मंडळाचे अधिकारी थकीत बिलांच्या नावाखाली थेट वीज जोडणी तोडण्यासाठी ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. यावेळी ग्राहकांशी अरेरावी करणे आणि दंड भरण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार वाढले आहेत.

या पार्श्वभूमीवर, मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील डुंबरे यांनी वीज मंडळाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. “एकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील ग्राहकांना साध्या वीज बिलासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रशासनाने आपली यंत्रणा सुधारून ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

येत्या एका महिन्यात मीटर रीडिंगमधील गोंधळ थांबवून बिले वेळेवर घरपोच न मिळाल्यास, ओतूर वीज मंडळाच्या विरोधात व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघाने दिला आहे. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Oturkar is troubled by the arbitrary management of mahavitaran hemant patil dumbare warns of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Electricity Bill
  • MSEDCL
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.