Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजधानी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी सातारा शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 08:36 PM
मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी सोमवारी सातारा शहर बंदची हाक
  • मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा
  • व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
 

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातही आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. राजधानी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी सातारा शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, सामाजिक संघटना आणि मराठा समाजबांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवतीर्थावर कार्यकर्ते एकवटले

बंदच्या पार्श्वभूमीवर राजधानी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शुक्रवारी पोवईनाका येथील शिवतीर्थावर जमले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने काही काळ परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

व्यापारी आणि नागरिकांच्या भूमिकेकडे लक्ष

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे हा सातारा बंद मागचा प्रमुख उद्देश असल्याचे मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला साताऱ्यातून पाठिंबा देण्यासाठी विविध घटकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनजीवनावर त्याचा काय परिणाम होतो, हेही सोमवारी स्पष्ट होणार आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला असताना साताऱ्यातील या बंदच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

Web Title: Satara bandh maratha reservation capital maratha kranti morcha manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
1

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार
2

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
3

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा
4

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.