Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं कोण? नरेश म्हस्केंनी घेतली भाजपच्या ‘त्या’ तिघांची नावं

Manoj Jarange Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी क्लिपची सायबर चौकशी करण्याची मागणी करत काही भाजप नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला.

  • By विवेक
Updated On: Oct 22, 2026 | 07:39 PM
Naresh Mhaske on Manoj Jarange audio Clip

Naresh Mhaske on Manoj Jarange audio Clip

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वाद
  • नरेश म्हस्केंनी घेतली काही नेत्यांची नावं
  • ऑडिओ क्लिप सायबर सेलकडे देण्याची मागणी
 

मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात आधीच विविध विषयांवरून वाद निर्माण होत असतानाच या ऑडिओ क्लिपमुळे वादाची अधिकच ठिणगी पडली आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आल्याचे दिसत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत धक्कादायक विधान केलं आहे.  (Manoj Jarange Audio Clip Controversy)

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना खासदार यांच्यामार्फत जरांगे पाटलांना 500 कोटी दिले असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरूनच नरेश म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचं म्हंटल आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या तीन नेत्यांची नावे घेतली असून त्यांनी घेतलेल्या नावांमुळं आता राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हस्के यांनी या क्लिपच्या सत्यतेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नरेश म्हस्केंनी नेमकं काय म्हटलं?

नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना ही ऑडिओ क्लिप पोलिसांकडे आणि सायबर सेलकडे देण्याचं आवाहन मनोज जरांगे यांना केलं. क्लिपमधील आवाजांची सत्यता तपासली, तर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हे समोर येऊ शकतं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात

तसंच, जरांगे आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचाही तपास व्हायला हवा, असं म्हस्के म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुराव्याशिवाय टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

श्वेता शालिनी, निधी कामदार आणि अतुल भातखळकरांची नावं चर्चेत

म्हस्के यांनी कथित क्लिपमधील आवाजांबाबत भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, निधी कामदार आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नावांचा उल्लेख केला. क्लिप खरी असेल आणि त्यात मित्रपक्षातील नेत्यांबाबत आक्षेपार्ह चर्चा असेल, तर वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित क्लिपमध्ये महिलांचं संभाषण ऐकू येत आहे. त्यातील एका महिलेने जरांगे यांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा केल्याचं ऐकू येत आहे. विधानसभा निवडणुकीतील जरांगेंच्या भूमिकेबाबतही संभाषणात चर्चा होत असल्याचं ऐकू येतआहे.

ही क्लिप खरी आहे की तिच्यात फेरफार करण्यात आला आहे, याबाबत सध्या ठोस निष्कर्ष काढता येत नाही. ती AI च्या मदतीने तयार करण्यात आली आहे का, हेदेखील तपासातूनच स्पष्ट होऊ शकतं.

त्यामुळे मूळ रेकॉर्डिंग, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या बाजू तपासल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येईल. आता या प्रकरणात अधिकृत चौकशी होते का आणि त्यातून काय निष्पन्न होतं, याकडे लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर नरेश म्हस्के काय म्हणाले?

    Ans: नरेश म्हस्के यांनी कथित ऑडिओ क्लिप पोलिसांकडे आणि सायबर सेलकडे देण्याचं आवाहन केलं. क्लिपची सत्यता तपासून त्यामागे कोण आहे, हे समोर आणण्याची मागणी त्यांनी केली.

  • Que: ऑडिओ क्लिपमध्ये श्वेता शालिनी, निधी कामदार आणि अतुल भातखळकर यांचे आवाज आहेत का?

    Ans: नरेश म्हस्के यांनी या नावांचा उल्लेख केल्याचं वृत्त आहे. मात्र, क्लिपमधील आवाज संबंधित व्यक्तींचेच आहेत, याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

  • Que: मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपची सत्यता सिद्ध झाली आहे का?

    Ans: क्लिपची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही.

Web Title: Manoj jarange audio clip controversy naresh mhaske reveals 3 bjp leaders vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Naresh Mhaske
  • shivsena

संबंधित बातम्या

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात
1

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
2

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापले! ५०० कोटींच्या उल्लेखाने नवा वाद
3

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापले! ५०० कोटींच्या उल्लेखाने नवा वाद

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर
4

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.