Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

Satara News: नगरपालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 12:25 AM
Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट...

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट...

Follow Us
Follow Us:

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाद
खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आपल्या गटातील नगरसेवकांची बैठक
भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा

सातारा: सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या बनकर–खंदारे वादाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, या प्रकरणानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या गटातील नगरसेवकांची तातडीची बैठक घेतल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर व पक्षप्रतोद निशांत पाटील अनुपस्थित होते .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नगरपालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. विषयांवरील चर्चेदरम्यान खंदारे यांनी बनकर यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर हुकूमशाही शैलीत कारभार चालवण्याचा आरोप केला. “अधिकार नसलेल्या पदाधिकाऱ्यांकडे कामे नेऊ नयेत,” असा टोला लगावत त्यांनी सभागृहातच वातावरण तापवले. या वक्तव्यामुळे खासदार गटातील नगरसेवकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सांगलीतील मंदिर दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख; जखमींच्या शीघ्र बरे होण्यासाठी केली प्रार्थना

सभागृहातील वातावरण नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर भाजपमधील आमदार गट आणि खासदार गटातील सुप्त नाराजी पुन्हा उघड झाल्याची चर्चा रंगली आहे.सायंकाळी जलमंदिर येथे झालेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित नगरसेवकांकडून संपूर्ण घडामोडींची माहिती घेतली.

Satara Politics : खासदार गटाची आढावा बैठकीला दांडी; सातारा नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय?

बैठकीत काही नगरसेवकांनी सभागृहातील आक्रमक भाषाशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीशीर माहिती आहे . शहरातील राजकीय समन्वय बिघडू नये, तसेच आगामी कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी संयम राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.एडवोकेट दत्ता बनकर यांच्या कार्यपद्धती संदर्भात बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली . दरम्यान, सातारा भाजपमधील वाढती अंतर्गत अस्वस्थता आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते, अशी चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे.

खासदार गटाची आढावा बैठकीला दांडी

सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, सर्वसाधारण सभेपूर्वी आयोजित आढावा बैठकीला अनेक नगरसेवकांनी दांडी मारल्याने ‘कुरघोड्यांचे’ राजकारण अजूनही संपलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. मात्र, खासदार उदयनराजे भोसले गटातील बहुतांश नगरसेवक अनुपस्थित राहिल्याचे चित्र दिसले.

Web Title: Satara bankar khandare dispute in bjp mp udayanraje bhosale cm fadnavis maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Satara
  • Udayan Raje Bhosale

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.