Rain Alert: मोठी बातमी! कोयनेतून तब्बल 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरू; सांगली-साताऱ्यात अलर्ट जारी
सातारा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. सतरा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. उसळधार पाऊस सुरु असल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठ्या प्रमाणत पाणीसाठा वाढत आहे. दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. तसेच सांगली साताऱ्यात देखील अलर्ट जरी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात असलेले कोयना धरण हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे धरण आहे. कोयना धरणातून नदीपात्रात ११,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत कोयना धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाच्या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे आज धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसरच सुरु करण्यात आला आहे. कोयना धारण परिसरात जोरदार पाऊस कायम आहे. कृष्णाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्हा आणि शिवसागर जलाशयात पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विसर्ग सुरु केला गेला आहे. कोयनेतून सोडले जाणारे पाणी हे थेट कृष्णा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ, तासगाव, पलूस आणि मिरजमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेला आहे. कोयन्तेउन विसर्ग वाढवला असल्याने सातारा, सांगलीतील स्थानिक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
राज्यातील विविध भागांत धुवाधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. असे असताना आता राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.
राज्यातील विविध भागांत धुवाधार पाऊस; पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीला पावसानं झोडपलं
रत्नागिरीत सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय, ढालघर फाट्याजवळ मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून आले. या मुसळधार पावसामुळे म्हसळामधील डोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत इशाराही दिला होता. जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूरच्या घाट भागात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल. काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.