Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage: पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

Water Shortage: नेवासा विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना प्रलंबित १८ योजनांपैकी १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 06:52 PM
Water Shortage:  पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
Follow Us
Follow Us:
  • पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा – गुलाबराव पाटील
  • पाणीटंचाई व पाणीपुरवठा योजनांचा आढावा
  • टँकरच्या डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे पारदर्शकतेवर भर
मुंबई/Water Shortage: पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून ती कार्यान्वित करावीत. टँकरद्वारे पाणीपुरवठा हा पहिला पर्याय नसून शेवटचा पर्याय असला पाहिजे. त्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणीटंचाईच्या अनुषंगाने नेवासा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व संबधित अधिकारी उपस्थित होते.

Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे ७५ ते ९९ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, त्या योजनांमधील वीज जोडणी, पाइपलाइन जोडणी, किरकोळ दुरुस्ती तसेच निधीअभावी प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नियमित निधी मिळण्यास विलंब होत असल्यास आवश्यकतेनुसार टंचाई निवारण आराखड्यातून निधी उपलब्ध करून ही कामे मार्गी लावावीत. यामुळे संबंधित योजना लवकर कार्यान्वित होऊन टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

नेवासा विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना प्रलंबित १८ योजनांपैकी १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

टँकरच्या संख्येतील वाढीची वस्तुस्थिती तपासा

टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना पारदर्शकता राखणे आणि संभाव्य गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी टँकरच्या फेऱ्यांची नोंद, प्रत्यक्ष पाणीपुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवणारी डिजिटल ट्रॅकिंग ॲप प्रणाली लागू करण्याबाबत बैठकीत भर देण्यात आला. प्रत्यक्ष गरजेनुसारच टँकरचे नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले.

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

पर्यायी उपाययोजनांना प्राधान्य

पाणीटंचाईच्या काळात थेट टँकर सुरू करण्याऐवजी आवश्यकतेनुसार विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या नळयोजना व पाइपलाइनची कामे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच आडवे बोअर घेणे यांसारख्या पर्यायी उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात. उपलब्ध पाणीस्रोतांचा योग्य वापर करून टंचाईग्रस्त गावांना शाश्वत व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Gulab rao patil order to officers solve water supply problem in maharashtra drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Gulabrao Patil
  • Maharashtra Drought 2026
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
1

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Mumbai Water Cut 2026:  मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई
2

Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
3

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
4

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.