Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Satara News : साताऱ्यातील गोडोली येथे टीव्ही आणि मोबाईलच्या वापरावरून झालेल्या कौटुंबिक वादात १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वडिलांनी बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, घटनास्थळावरील पुरावे पुसण्याच्या प्रयत्नाचाही तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 04, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • टीव्ही आणि मोबाईलवरून घरात वाद
  • घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न
  • चौकशीत वडिलांची कबुली; पोलिसांचा पुढील तपास सुरू
Satara News :साताऱ्यातील गोडोली परिसरात कौटुंबिक वादातून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून सुरू झालेला वाद मोबाईलच्या वापरावरून अधिक वाढला. याचदरम्यान वडिलांनी मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. घटनेनंतर घरातील रक्ताचे डाग आणि अन्य पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

टीव्ही आणि मोबाईलवरून घरात वाद

पोलिस तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी आई-वडील आणि कुटुंबीयांसोबत गोडोली परिसरात राहत होती. तिच्या वर्तनावरून गेल्या काही दिवसांपासून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून घरात वाद सुरू झाला.

त्यानंतर मोबाईलच्या वापरावरूनही वाद वाढला. याचदरम्यान परिस्थिती चिघळली आणि मुलीच्या हातातील लाकडी बॅट वडिलांनी हिसकावून घेत तिच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.

Ramesh Mhatre Doctor Assault : डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेच्या अडचणी वाढल्या; आधारवाडी कारागृहात रवानगी

घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न

बॅटचा प्रहार झाल्यानंतर मुलगी घरातच कोसळली. मात्र, घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली नाही. रविवारी सकाळी मुलगी घरात बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मुलगी पडलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कुटुंबीयांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला बोलावून घराची बारकाईने तपासणी करण्यात आली.

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

चौकशीत वडिलांची कबुली; पोलिसांचा पुढील तपास सुरू

या प्रकरणात पुरुषोत्तम संपत कदम यांची आणि त्यांच्या पत्नीची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. दिवसभराच्या चौकशीनंतर वडिलांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपलब्ध माहितीनुसार, पुरुषोत्तम कदम हे शिक्षक असून त्यांची पत्नी शीला कदम यादेखील शिक्षिका आहेत.

ते मूळचे चंचळी, तालुका कोरेगाव येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न का झाला आणि मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Satara news godoli shaken father attacks daughter with a bat following a family dispute she dies before receiving treatmentcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • crime news
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
4

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.