
महाबळेश्वर : महाबळेश्वर म्हणजे साताऱ्याची शान. मात्र तालुक्यातील भेकवलीवाडी येथील राखीव वनक्षेत्रात गावातील गटाराचे सांडपाणी सोडण्याच्या बेकायदेशीर उद्देशाने जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असतानाच वनविभागाने धडक कारवाई केली. ही घटना बुधवारी (दि. ०५) ही घटना उघडकीस आली.याप्रकरणी वनविभागाने प्रकाश राघु ढेबे (वय ३५, रा. शिंदोळा) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. वनविभागाने घटनास्थळावरून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी जप्त केला.
वनकायद्यानुसार वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा गटाराचे पाणी सोडण्यास सक्त बंदी आहे. असे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास दोषीस १ वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंतचा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती वनविभागाने दिली. उपवनसंरक्षक (सातारा) अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप अधिकारी सुनील लांडगे, वनरक्षक बा. भ. मराडे, तुकाराम निकम, विकास रूपनूर, निलेश सपकाळ, गणेश बागदरे आणि रोजंदारी मजूर यांचे पथक सहभागी झाले होते. वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे पुढील तपास करीत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सर्व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. वनक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे बिगर-वन (वनेत्तर) काम करावयाचे असल्यास, वनविभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. वनहद्दीत विनापरवाना प्रवेश करणे, अतिक्रमण करणे, प्लास्टिक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे किंवा शिकार करणे यांसारखे अवैध प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी कोणतीही घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती तत्काळ वनविभागास कळवून सहकार्य करावे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही वनविभागाने स्पष्ट केले.
Ans: महाबळेश्वर तालुक्यातील भेकवलीवाडी येथील राखीव वनक्षेत्रात गावातील गटाराचे सांडपाणी सोडण्याच्या बेकायदेशीर उद्देशाने जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असतानाच वनविभागाने धडक कारवाई केली.
Ans: वनकायद्यानुसार वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा गटाराचे पाणी सोडण्यास सक्त बंदी आहे.
Ans: वनहद्दीत विनापरवाना प्रवेश करणे, अतिक्रमण करणे, प्लास्टिक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे किंवा शिकार करणे यांसारखे अवैध प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.