Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchgani News: पाचगणीत नगरसेवकाच्या घरात घोड्याचा ‘मुक्काम’; पांचगणीत मोकाट जनावरांचा उच्छाद

Panchgani News: वाई-पांचगणी-महाबळेश्वर हा प्रमुख पर्यटन मार्ग असो वा पांचगणी-गणेशपेठ रस्ता, सध्या या सर्वच मार्गांवर घोडे, गायी आणि गाढवांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध झुंडीने ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीचा पुरता बुरडा उडाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 04:07 PM
Panchgani News, Satara Politics, Tourist Destination,

Panchgani News, Satara Politics, Tourist Destination,

Follow Us
Follow Us:

Panchgani News: हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी शहराला सध्या मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवाचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरून चालणे आणि वाहने चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. शहरात मोकाट जनावरांनी मांडलेल्या उच्छादामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, पालिका प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसल्याचे चित्र आहे. प्रशासन एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

​मुख्य रस्त्यांवर जनावरांचे साम्राज्य, अपघात वाढले

वाई-पांचगणी-महाबळेश्वर हा प्रमुख पर्यटन मार्ग असो वा पांचगणी-गणेशपेठ रस्ता, सध्या या सर्वच मार्गांवर घोडे, गायी आणि गाढवांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध झुंडीने ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीचा पुरता बुरडा उडाला आहे. महामार्गावरून वेगात जाणाऱ्या वाहनांना या जनावरांमुळे अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. याशिवाय मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, बस स्थानक परिसर, नाका, शॉपिंग सेंटर, महात्मा फुले शाळा आणि कॉलेज परिसर या वर्दळीच्या ठिकाणी जनावरांच्या सुळसुळाटामुळे पादचाऱ्यांना चालणेही असह्य झाले आहे.

भगवान श्रीकृष्ण दिवसातून ५ वेळा नमाज पठण करायचे; मौलाना जरजिस अन्सारींच्या वादग्रस्त विधान, हिंदू संघटना आक्रमक

घरात आणि दुकानात घुसखोरी; नगरसेवकाच्या घरातच ठिय्या!

मोकाट जनावरांचा उपद्रव आता केवळ रस्त्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ही जनावरे थेट नागरिकांच्या घरात आणि व्यापारी गाळ्यांमध्ये घुसून दहशत निर्माण करत आहेत. अशीच एक थरारक घटना नुकतीच समोर आली. रात्रीच्या अंधारात एका मोकाट घोड्याने चक्क एका नगरसेवकाच्या घरात प्रवेश केला आणि थेट तिथेच मुक्काम ठोकला. सकाळी घरातील सदस्य उठले तेव्हा समोर घोडा उभा असल्याचे पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घोड्याने लोकप्रतिनिधीच्या घराचाच तबेला केल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

​१५ वर्षांपासून कोंडवाडा बेपत्ता; पालिकेचा ढिसाळ कारभार

या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. गेल्या १० ते १५ वर्षांत नगरपालिकेने मोकाट जनावरांवर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई केलेली नाही. धक्कादायक बाब अशी की, पालिकेचा अधिकृत कोंडवाडा नेमका कुठे आहे, याचा पत्ताच नाही. पालिकेकडे कोंडवाडाच अस्तित्वात नसल्याची उलटसुलट चर्चा असून, हा कोंडवाडा फक्त कागदोपत्रीच जिवंत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

​पर्यटनाचा दर्जा घसरवणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या समस्येचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, मोकाट जनावरांना तात्काळ ताब्यात घेऊन कोंडवाड्यात डांबावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

 

Web Title: Satara news panchgani municipality negligence stray horse enters corporator house animals menace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Panchgani News
  • Satara Politics
  • Stray Dogs

संबंधित बातम्या

Ratnagiri: ‘…अन्यथा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करू’; भटक्या श्वानांवरून रत्नागिरीत वातावरण तापले
1

Ratnagiri: ‘…अन्यथा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करू’; भटक्या श्वानांवरून रत्नागिरीत वातावरण तापले

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
2

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
3

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.