Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

Satara News : राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांवर संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला करायचंय ते करा,” अश्या भाषेत त्यांनी पत्रकारांवर अरेरावी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 11:49 AM
Sanjay Dina Patil, Satara News, Patan News, Journalist Protection Act,

Sanjay Dina Patil, Satara News, Patan News, Journalist Protection Act,

Follow Us
Follow Us:

Satara News: पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपाप्रकरणी शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी साताऱ्यातील पाटण तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय पाटील यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी सोपान टोम्पे आणि तहसीलदार अनंत गुरव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई येथे पत्रकारांविषयी शिवराळ भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली.सैंविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय आहे. अशा मस्तवाल खासदाराचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पाटण तालुका पत्रकार संघ जाहीर निषेध करीत असून, लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या खासदाराचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी;

यावेळी पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या प्रसंगी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रांत कांबळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य शंकर मोहिते, महिला राज्य सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर, सचिव नितीन खैरमोडे, सहसचिव राजेंद्र सावंत, उपाध्यक्ष संदेश बनसोडे तसेच पत्रकार निलेश साळुंखे, सुरेश संकपाळ, संजय कांबळे, बाबासाहेब सुतार, योगेश हिरवे, खाशाबा चव्हाण आदी पत्रकार उपस्थित होते.

 

काय म्हणाले होते संजय पाटील ?

राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांवर संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला करायचंय ते करा,” अश्या भाषेत त्यांनी पत्रकारांवर अरेरावी केली.

National Teacher Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करताना संजय दिना पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. आपल्या विरोधात जाणाऱ्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात पाठवण्याची भाषा त्यांनी वापरल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याच संदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकार त्यांच्याकडे गेले असता हा नवा वाद निर्माण झाला. संजय दिना पाटील यांनी आपण केलेली विधाने लपूनछपून नसून उघडपणे केली असल्याचे सांगितले.

ते यावेळी म्हणाले, “मी जे बोलतोय ते खुलेआम बोलतोय. माझ्यावर काय कारवाई करायची असेल तर पोलीस करतील. मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे.” यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संताप व्यक्त करत ते म्हणाले, “तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर का धरता? आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना? मग इकडे का येता? कशाला हे सगळं करताय?” असे म्हणत त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

Web Title: Satara news patan journalists protest against mp sanjay dina patil demand resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • sanjay patil
  • Satara News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.