Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

Satara News : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात शिक्षकांनी मूक मोर्चा काढला. २६ हजार कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 08:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मागण्या आणि इशारा
  • कोणकोण सहभागी झाले ?
  • निवेदन कोणाला दिलॆ
Satara News : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित आस्थापनेवर नियुक्त होऊन त्यानंतर नियमित वेतनश्रेणीसह शंभर टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी साताऱ्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून मूक मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघासह विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात मागण्यांचे फलक घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने काढलेल्या या मोर्चातून शासनाचे लक्ष प्रलंबित पेन्शन प्रश्नाकडे वेधण्यात आले.

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

मागण्या आणि इशारा

राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली.  २५ सप्टेंबरपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

त्यानंतर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याची भूमिकाही निवेदनातून स्पष्ट करण्यात आली.
दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक, कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. तसेच २६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

कोणकोण सहभागी झाले ?

मोर्चात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ, सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना, प्रयोगशाळा महासंघ, ग्रंथपाल संघटना, शिक्षण संस्था संघटना, शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

निवेदन कोणाला दिलॆ

मुख्यमंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. मोर्च्यात सहभागी झालेल्या लोकांनी नंतर आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले आहे . आता याबाबत संबंधित अधिकारी तसेच सरकार काय भूमिका घेत आहे हे येत्या काळात आपल्याला कळेल , आणि त्यानंतरच पुढची दिशा ठरवू असे मोर्च्यात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले आहे .

 

Web Title: Satara news teachers take to the streets demanding the old pension scheme silent march in satara warning of protest in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Maharashtra Goverment
  • Protest
  • Satara News
  • Teachers Strike

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
1

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार
2

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
3

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा
4

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.