Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर

नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेत विचारले, "सकाळी कामावर येण्याची वेळ, बायोमेट्रिक हजेरी, हालचाल रजिस्टर मेंटेन करणे या शासकीय नियमांचे पालन होते का?" यावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही. मंगळवार आणि बुधवारी स्वतः मुख्याधिकारी दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित नव्हत्या.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 06:55 PM
Wai Municipal Council, Satara News, Anil Sawant, Ajit Shinde, Sangram Pawar, Local Politics,

Wai Municipal Council, Satara News, Anil Sawant, Ajit Shinde, Sangram Pawar, Local Politics,

Follow Us
Follow Us:

Satara News: वाई नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार (२५ जून) पार पडली. वरकरणी ही सभा खेळीमेळीत झाल्याचा आव आणला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाचा ढिसाळ कारभार, नगरसेवकांमधील अंतर्गत हेवेदावे आणि काही प्रमुख नगरसेवकांची गूढ पाठ फिरवणे यामुळे ही सभा प्रचंड वादळी आणि गाजणारी ठरली. “अधिकारी नियमांचे पालन करतात का?” या नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. नगरपरिषदेचा एकूणच कारभार पाहता वाईकरांमधून आता ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. “प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसून, उलट माहिती देण्यास मज्जाव केला जात आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी सभागृह अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अनिल सावंत यांनाच जाब विचारला. यावरून नगरसेवक शैलेंद्र देवकुळे, अजित शिंदे आणि नगराध्यक्ष सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर नगराध्यक्षांनी मध्यस्थी करत तूर्तास या विषयावर पडदा टाकला.

लातूर पोलिसांचा दणका: – वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

प्रभाग क्र. ७ आणि क्र. ८ मधील विकासकामांवरून दोन्ही प्रभागांतील नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. “आपल्यापल्या प्रभागात लक्ष घालून विकासकामे करावीत,” यावरून बराच खल झाला. अखेर नगर सेवक भारत खामकर यांनी मध्यस्थी करत “ज्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात कामे करावीत” अशी विनंती करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

या सभेला राष्ट्रवादी (अजित पवार) चे गटनेते आणि त्यांचे सहकारी नगरसेवक-नगरसेविका, तसेच भाजपाचे तीन नगरसेवक अनुपस्थित होते.राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक संग्राम पवार हे वारंवार सभेला गैरहजर राहत असल्याचा आरोप काही उपस्थित नगरसेवकांकडून दबक्या आवाजात सभागृहात केला गेला. “गटनेता असूनही ते प्रभागातील किंवा सहकाऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसत नाहीत,” अशी कुजबुज सुरू होती.

राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा समजल्या जाणाऱ्या नगरसेविका निलिमा खरात आणि नगरसेवक संदीप जावळे यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. तर नेहमी विकासाचे मुद्दे मांडणारे नगरसेवक प्रसाद बनकर यांना आता विकासाबद्दल आपुलकी राहिली नाही का? असा सवाल त्यांच्या गैरहजेरीमुळे उपस्थित झाला. नगरसेवक संग्राम सपकाळ, संदीप जावळे आणि ज्योती गांधी यांच्या अनुपस्थितीवर मात्र सभागृहाने मौन बाळगणे पसंत केले.

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेत विचारले, “सकाळी कामावर येण्याची वेळ, बायोमेट्रिक हजेरी, हालचाल रजिस्टर मेंटेन करणे या शासकीय नियमांचे पालन होते का?” यावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही. मंगळवार आणि बुधवारी स्वतः मुख्याधिकारी दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित नव्हत्या. कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी यांना विचारले असता त्यांनी “कोल्हापूरला मिटिंग आहे” असे सांगितले. “हालचाल रजिस्टरमध्ये नोंद आहे का?” असे विचारताच गोसावी यांनी “मुख्याधिकाऱ्यांची नोंद असते का?” असा उलट प्रश्न विचारून नियमांची ऐशीतैशी केली.

नगरसेवकांनी जेव्हा मुख्याधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी “माझा कार्यकाळ संपला आहे, तुम्ही कार्यक्षम अधिकारी आणा!” असे अत्यंत बेजबाबदार आणि उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.पाणी पुरवठ्याबाबत विचारणा केली असता, मुख्याधिकाऱ्यांनी “वाई शहराला दिवसातून दोन ते चार वेळा पाणी पुरवठा होतो” असा अजब दावा केला. मुख्याधिकाऱ्यांचा हा दावा म्हणजे वाईकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, “खरंच शहराला इतक्या वेळा पाणी मिळते का?” हा आता वाईकरांसाठी मोठ्या संशोधनाचा विषय बनला आहे.

नगराध्यक्षांनी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल केला. “आरोग्य विभागाचे काही लोक हॉटेलचा कचरा उचलतात आणि त्याच्या बदल्यात त्याच हॉटेलमध्ये जेवणावळी झोडत आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांना संस्थेच्या विकासाचे कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर

एकंदरीत वाई नगरपरिषदेच्या कामकाजाबद्दल नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. “यापुढे दप्तर दिरंगाई किंवा बेशिस्त कारभारामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्यास, ते नुकसान थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केले जाईल,” असा कडक इशारा नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.

या वादळी सभेत एकूण १७७ विषय मांडण्यात आले. काही विषय मंजूर झाले तर काही पुढील सभेसाठी तहकूब ठेवायचे ठरले. मात्र, या संपूर्ण सभेदरम्यान उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांनी चकार शब्दही काढला नाही. महत्वाच्या विषयांवर कोणतीही भूमिका न मांडता त्यांनी बाळगलेले मौन म्हणजे या सर्व कारभाराला त्यांची ‘मूक संमती’ आहे का? असा संतप्त सवाल आता वाईकर नागरिक विचारत आहेत.

 

 

 

Web Title: Satara news wai municipal council general body meeting stormy anil sawant ajit shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
1

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
2

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.