
Satara News, Satara Police, Ganeshotsav, Nilesh Tambe,
पोलिस प्रशासनाच्या जनजागृतीला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तब्बल ९५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम स्वीकारला आहे. विशेष म्हणजे सातारा तालुक्यातील १२१ गावांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘डॉल्बीचा आव्वाज खाली’झालेला पहायला मिळतोय. पोलीस निरीक्षक यांनी विविध गणेशोत्सव मंडळांना घातलेली साद पाहून १५३ गावापैकी १२१ मंडळांनी दिलेला हा प्रतिसाद जिल्ह्यासाठी आदर्शवतच ठरलं आहे.
Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या
सातारा तालुक्यातील डॉल्बीमुक्त गावात हे घडलं ते जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी गणेशात्सवापूर्वी विविध गावचे पोलीस पाटील, गणेशात्सव मंडळाचे पदाधिकारी यांना एकत्रित करत डॉल्बीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत कानमंत्र दिला.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर यांनीही सातारा येथील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही जेव्हा अनेकांनी डॉल्बीबाबत चार बेसच्या परवानगीबाबत भूमिका व्यक्त केल्या. त्यानंतर डॉ. वैशाली कडूकर यांनीही डॉल्बीला दोन चार नव्हे तर त्याहून अधिक बेसला परवनगी देवू. पण डॉल्बी जिथे वाजवली जाणार आहे, तिथे आपल्या घरातील ज्येष्ठांना आणून बसवावे अन मग डॉल्बी वाजवावी, असे सांगताच सभागृहात एकच निरव शांतता पसरली होती. त्यामुळे या सर्व बाबींचा सातारा तालुक्यातील अनेक मंडळांमधील कार्यकर्त्यांनी या बाबींचा गांभीर्याने विचारात घेत डॉल्बीला नो एंट्री म्हटलं आहे.
RAW Foundation Day: कशी झाली ‘रॉ’ची स्थापना! १९६५ च्या युद्धातील अपयशानंतर का भासली गरज?
सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १५३ गावे आणि ३८९ गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विविध गावांमध्ये मंडळे, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
गेल्या वर्षी तालुक्यातील ७१ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविला होता. यंदा ही संख्या वाढून ९५ गावांवर पोहोचली आहे. गावागावांत एकच सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सवातील अनावश्यक स्पर्धा, खर्च आणि गर्दी कमी करण्याबरोबरच गावातील एकोपा वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.