Latur Police Crack 5 Vehicle Theft Cases Arrest
Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
बाईक चोरीच्या प्रकरणात गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी उपाय योजना आखल्या होत्या. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आरोपीला शोधत अटक करण्यात आली. आरोपीची चौकशी केल्यावर महत्वपूर्ण माहिती मिळाली.आरोपीने शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटार सायकलची चोरी केली होती. या कारवाई मुळे आरोपीला अटक करून वाहन चोरीचा मुद्दा निकलीस लावला आहे.
या कारवाईत समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी महत्वाचं योगदान दिले.






