फोटो सौजन्य सोशल मीडिया
Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार
राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली. २५ सप्टेंबरपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
त्यानंतर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याची भूमिकाही निवेदनातून स्पष्ट करण्यात आली.
दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक, कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. तसेच २६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
मोर्चात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ, सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना, प्रयोगशाळा महासंघ, ग्रंथपाल संघटना, शिक्षण संस्था संघटना, शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. मोर्च्यात सहभागी झालेल्या लोकांनी नंतर आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले आहे . आता याबाबत संबंधित अधिकारी तसेच सरकार काय भूमिका घेत आहे हे येत्या काळात आपल्याला कळेल , आणि त्यानंतरच पुढची दिशा ठरवू असे मोर्च्यात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले आहे .






